शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली हल्ल्यातील शहीद जवानांना पालकमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

By admin | Updated: March 13, 2017 02:18 IST

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले प्रेमदास मेंढे आणि नंदकुमार आत्राम यांना रविवारी सकाळी नागपूरच्या

नागपूर : नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले प्रेमदास मेंढे आणि नंदकुमार आत्राम यांना रविवारी सकाळी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक राज कुमार, पोलीस उपमहानिरीक्षक ए.पी. सिंग, कमांडंट मनोजकुमार ध्यानी, सेकंड कमांडंट सत्यप्रकाश, अतिरिक्त कमांडंट तोनसिंग, विभागीय कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी शिरीश पांडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना श्रध्दांजली वाहिली. छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १२ जवान शहीद झाले. त्यात पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील प्रेमदास मेंढे, चंद्रपूर जिल्ह्यातील नंदकुमार आत्राम आणि भंडारा जिल्ह्यातील मंगेश बालपांडे यांचा समावेश असून मेंढे आणि आत्राम यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने रविवारी येथे आणण्यात आले. विमानतळावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पार्थिवांना पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)