शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

चौफेर पहारा...

By admin | Updated: July 31, 2015 02:45 IST

याकूब मेमनला फाशी दिल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वेस्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

दयानंद पाईकराव नागपूरयाकूब मेमनला फाशी दिल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वेस्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. एके ४७ आणि इतर आधुनिक शस्त्र घेऊन ठिकठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि लोहमार्ग पोलीस कर्तव्य बजावत आहेत. नागपूर रेल्वेस्थानक हे देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. येथे दिवसाकाठी ११० ते १२० रेल्वेगाड्या आणि ४० ते ४५ हजार प्रवासी ये-जा करतात. यापूर्वी सुद्धा रेल्वेस्थानकावर घातपाताच्या धमक्या मिळाल्या आहेत. याकूब मेमनला फाशी देण्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. नक्षल सप्ताह सुरू असल्यामुळे पोलीस कुठलाच धोका पत्करायला तयार नाहीत. लोहमार्ग पोलिसांनी सशस्त्र २२ जणांची क्विक रिस्पॉन्स टीम तैनात केली आहे. याशिवाय रेल्वेस्थानकावर ५० ते ६० पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला आहे. गुरुवारी सकाळी २० महिला पोलिसांचे बंदुकधारी निर्भया पथक रेल्वेस्थानकावर तैनात करण्यात आले. याशिवाय बॉम्ब शोधक व नाशक पथकही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने ५० ते ६० जवान विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. बॅग स्कॅनर, डोअर मेटल डिटेक्टर, हँड मेटल डिटेक्टरच्या साह्याने प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नक्षल सप्ताह सुरू असल्यामुळे पोलीस परिस्थिती काळजीपूर्वक हाताळताना दिसत आहेत. आणखी दोन दिवस हा बंदोबस्त असाच राहणार असल्याची माहिती रेल्वेस्थानकावरील सुत्रांनी दिली आहे.श्वानपथकाची दमछाकरेल्वे सुरक्षा दलाच्या श्वानपथकात तीन श्वान आहेत. यातील दोन श्वान पॅडी आणि रिनु हे बॉम्बशोधक आहेत तर सनी नावाचा श्वान ‘ट्रॅकर’ असून तो चोरीचा शोध घेतो. त्यामुळे पॅडी आणि रिनुलाच बॉम्ब शोधण्यासाठी मेहनत करावी लागत आहे. पॅडीने काल बुधवारी रात्री २ ते गुरुवारी सकाळी १० पर्यंत सतत ड्युटी केल्यामुळे तो बऱ्यापैकी थकला होता. त्याला विश्रांती देऊन रिनु नावाच्या श्वानाला सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत बोलविण्यात येणार होते. दरम्यान असामाजिक तत्त्वामध्ये भीती निर्माण होण्यासाठी पॅडी आणि रिनुला विश्रांती देऊन गुरुवारी रात्री सनी नावाच्या श्वानाला ड्युटीसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती या श्वानांचे हँडलर राजु मुटकुरे यांनी दिली.बसस्थानकावर नव्हता पोलीस बंदोबस्तसंपूर्ण शहरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडेकोट बंदोबस्त लावलेला असताना गुरुवारी सकाळी गणेशपेठच्या मध्यवर्ती बसस्थानकावर मात्र एकही पोलीस हजर नसल्याचे चित्र दृष्टीस पडले. गणेशपेठ बसस्थानकातून संपूर्ण विदर्भात बसेस सोडण्यात येतात. यात प्रवाशांची संख्याही हजारो असते. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्त लावणे अपेक्षित होते. परंतु एकही पोलीसाची ड्युटी येथे न लावण्यात आल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.बडकस चौकात पोलिसांची गस्त महाल येथील बडकस चौक हा संवेदनशील मानला जातो. पण याकूबला फाशी दिल्यानंतर बडकस चौक शांत होता. काही युवकांनी सकाळी एकत्रित बडकस चौकात रपेट मारली. पण गोंधळ नव्हता. चौकात पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात होते तर पोलिसांचे गस्ती वाहनही सातत्याने महाल परिसरात फिरत असल्याने कुठलाही गोंधळ होणे शक्य नव्हते. मुळात याकूबच्या फाशीची मानसिकता तयार असल्याने एरवी संवेदनशील असणारा शहराचा प्रत्येक कानाकोपरा शांत होता. सकाळ झाल्यावर महाल परिसरातील दुकाने उघडली आणि रोजप्रमाणेच दैनंदिन आयुष्याला प्रारंभ झाला.