शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्या करप्रणालीपेक्षा जीएसटी सक्षम

By admin | Updated: January 2, 2017 02:32 IST

पूर्वीच्या करप्रणालीपेक्षा जीएसटी सुटसुटीत आणि सुलभ आहे. ही करप्रणाली आॅनलाईन असल्यामुळे

सुनील लहाने : डिक्कीतर्फे जीएसटीवर चर्चासत्र नागपूर : पूर्वीच्या करप्रणालीपेक्षा जीएसटी सुटसुटीत आणि सुलभ आहे. ही करप्रणाली आॅनलाईन असल्यामुळे करनिर्धारक विभागातील अधिकाऱ्यांचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना या प्रणालीचा फायदाच होईल, असे मत विक्रीकर उपायुक्त सुनील लहाने यांनी येथे व्यक्त केले. दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीतर्फे (डिक्की) जीएसटीवर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी कॉन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, स्टेट बँक आॅफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक मोहन चांगदे, सीए जुल्फेश शाह, डिक्कीचे पश्चिम भारताचे समन्वयक व विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष निश्चय शेळके, सिंडीकेट बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक राघवेंद्र सोनडवले, एचडीएफसी बँकेचे क्लस्टर हेड गगनदीप बुधराजा, डिक्की विदर्भ चॅप्टरचे उपाध्यक्ष गोपाल वासनिक उपस्थित होते. लहाने म्हणाले, जीएसटी मॉडेल कायदा असून यात पुढे काळानुरूप सुविधेनुसार बदल करण्यात येईल. करधारकाच्या बाजूने असणारा ‘प्रो इंडस्ट्री प्रो ट्रेडर्स’ कायदा आहे. त्यात सर्व अप्रत्यक्ष कर एकत्र करून जीएसटी तयार झाला आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढून जीएसटीमध्ये वाढ होईल. प्रारंभी एक वर्ष महागाईच्या दरात थोडी वाढ होईल, पण नंतरच्या वर्षांत फायदे दिसून येतील. जीएसटीमध्ये राज्य व केंद्रीय अशी दुहेरी करप्रणाली असेल तर १२ ते २८ टक्क्यांपर्यंत वस्तू व सेवा कराचा दर असेल. यामध्ये ५० टक्के कर राज्याला आणि ५० टक्के कर केंद्राला जाईल. लहाने म्हणाले, २० लाखांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्यांना नोंदणी करावी लागेल. तीन दिवसांत नोंदणी होऊन प्रमाणपत्र मिळेल. महिन्याला तीन यानुसार वर्षाला ३६ विवरण भरावे लागतील. सर्व कराचा भरणा आॅनलाईन करावा लागेल. यावेळी बी.सी. भरतीया, जुल्फेश शाह, गगनदीप बुधराजा यांनी जीएसटी करप्रणालीवर मार्गदर्शन केले. प्रास्तविक निश्चय शेळके यांनी तर संचालन डिक्कीचे विजय सोमकुवर यांनी केले. गोपाल वासनिक यांनी आभार मानले. यावेळी डिक्की विदर्भ चॅप्टरचे राजू दवंडे, मनोज दिवे, चंदू पाटील, रूपराज गौरी आणि अनेक उद्योजक उपस्थित होते.(प्रतिनिधी)