शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीत अडकला जाहीरनामा!

By admin | Updated: February 14, 2017 01:54 IST

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे मतदान अवघ्या आठवडाभरावर आले आहे.

भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनाम्याविनाच प्रचार : उपराजधानीच्या विकासाचा ‘रोडमॅप’ कधी मांडणार?नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे मतदान अवघ्या आठवडाभरावर आले आहे. सर्वच उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असून अद्यापही बहुतांश मोठ्या पक्षांनी जाहीरनामा घोषित केलेला नाही. काँग्रेस, भाजपा या दोन्ही पक्षांचे नेते गेले काही दिवस पक्षातील बंडखोरीची आग विझविण्यातच व्यस्त होते. आजच्या तारखेत बहुतांश पक्षांचे जाहीरनामे तयार झाले असले तरी, सर्वांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ अशीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे उपराजधानीच्या विकासाचा ‘रोडमॅप’ मतदारांपुढे पक्ष मांडणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.महापालिकेच्या निवडणुका आल्या की बहुतेक सर्व राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करतात. शहराच्या विकासासाठी आमचा पक्ष काय काम करणार आहे व कोणत्या योजना राबविणार आहे, याचा दावा या जाहीरनाम्यामध्ये केला जातो. निवडून आल्यानंतर विकासाच्या कुठल्या गोष्टीना प्राधान्य देण्यात येणार, हे सांगत पुढील पाच वर्षांची कामाची ‘ब्ल्यूप्रिंट’च मतदारांसमोर सादर करण्यात येते. यंदा नागपुरात शिवसेना वगळता एकाही मोठ्या पक्षाने अद्यापही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. भाजपाने राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत गाजावाजा करीत ‘पारदर्शी’ जाहीरनामा प्रकाशित केला. अगदी ‘स्टॅम्प पेपर’ हमी देत जाहीरनामा जनतेसमोर मांडण्यात आला. मात्र उपराजधानीत अद्याप त्यासाठी पावले उचलण्यात आलेली नाही.भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा जाहीरनाम्याविनाच प्रचार सुरू आहे. काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद या निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला तर भाजपाला बंडखोरीचा सामना करावा लागला. अंतर्गत वाद शमविण्यातच नेत्यांचा वेळ गेल्याने जाहीरनाम्याकडे नेत्यांचे दुर्लक्षच झाल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी) उमेदवार स्वत:च घेत आहेत पुढाकारपक्षांकडून जाहीरनामे प्रसिद्ध झाले नसले तरी विविध पक्षांच्या उमेदवारांनी प्रभागपातळीवरच ‘मिनी जाहीरनामे’ तयार केले आहेत. यात मागील पाच वर्षांच्या कामगिरीसोबतच पुढील पाच वर्षांच्या विकासाच्या ‘रोडमॅप’चा समावेश आहे. पक्षाच्या जाहीरनाम्याची प्रतीक्षा करीत राहिलो तर मतदारांसमोर आम्ही काय ‘व्हिजन’ घेऊन जाणार? त्यामुळेच आम्ही प्रभागपातळीवर पुढाकार घेतला असल्याची माहिती काही उमेदवारांनी दिली.दुसऱ्या पक्षांसाठी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’जवळपास सर्वच पक्षांचे जाहीरनामे तयार झाले आहेत. मात्र दुसऱ्या पक्षांच्या जाहीरनाम्यात कुठले मुद्दे आहेत, याबाबत अद्याप स्थिती स्पष्ट झालेली नाही. इतर पक्ष जाहीरनामा कधी प्रकाशित करणार, या प्रतीक्षेमुळे सर्वच पक्षांना स्वत:चा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास विलंब झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नेते म्हणतात, विस्तृत जाहीरनामा मांडणारयासंदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जाहीरनामा तयार झाला असल्याचे स्पष्ट केले. जनतेला नेमक्या काय अपेक्षा आहेत, याचा अभ्यास करून जाहीरनामा तयार झाला आहे. लवकरच तो मतदारांपुढे पोहोचविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा तयार झाला आहे. विविध प्रभागातील मतदारांशी चर्चा केल्यानंतर जाहीरनामा तयार करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल देशमुख यांनी दिली. भाजपाचा जाहीरनामा तयार झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना तो दाखविण्यात येणार आहे. सर्वांच्या अपेक्षांना स्थान देणारा सर्वसमावेशक जाहीरनामा आम्ही तयार केला असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दिली.