शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींना राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

By admin | Updated: May 28, 2017 02:15 IST

भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दपूर्तीनिमित्त देश-विदेशातील मान्यवरांनी शनिवारी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

देशभरातील मान्यवरांनी केले वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दपूर्तीनिमित्त देश-विदेशातील मान्यवरांनी शनिवारी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सकाळच्या सुमारास गडकरींना शुभेच्छा दिल्या व त्यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय मंत्रिमंडळातील गडकरी यांचे सहकारी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनीदेखील गडकरींना शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री विजय गोयल, केंद्रीय मंत्री कलराज मिश्र, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांच्यासह देशातील आघाडीच्या उद्योगपतींनी गडकरी यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीपासून नागपुरातील गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी नेते व कार्यकर्त्यांची गर्दी होती. रात्री १२ वाजता आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. याप्रसंगी ६१ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या गडकरी यांनी कुटुंबीयांसोबत वाढदिवसाचा केक कापला. गडकरींनी केले चार संकल्प ६१ व्या वर्षांत पदार्पण केल्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहू, असे सांगत गडकरी यांनी वाढदिवसाप्रीत्यर्थ चार संकल्प केले. यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या संपविण्यासाठी विदर्भात विविध योजना कशा आणता येतील, यासाठी प्रयत्न करणे, बद्रीनाथ-केदारनाथ चारधामचा १२ हजार कोटींचा रस्ता पूर्ण करणे, विदर्भात २० लाख लिटर दुधाची निर्मिती झाली पाहिजे यासाठी प्रकल्प आणणे. याचा पाच लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, तसेच दावोस येथील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या धर्तीवर उत्तराखंड येथील ओली येथे प्रकल्प तयार करणे, याचा समावेश आहे. गडकरींनी मारली दर्डांना घट्ट मिठी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा हे नितीन गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी पोहचले. यावेळी नितीन गडकरी यांनी दर्डा यांना घट्ट मिठी मारली. याप्रसंगी गडकरी व दर्डा यांनी आपल्या निखळ आणि पक्षाभिनिवेष यापलीकडे असलेल्या मैत्रीच्या अनेक आठवणी जागवल्या. यावेळी सौ. कांचनताई गडकरी आणि कुटुंबीय उपस्थित होेते. लोकमतच्या विशेषांकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दपूर्तीप्रीत्यर्थ लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘षष्ट्यब्दपूर्ती’ या विशेषांकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. याप्रसंगी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी गडकरी यांना हा विशेषांक भेट दिला. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, मुंबईतील प्रख्यात हिरे व्यापारी किरीट भन्साळी, विक्रीकर विभागाचे आयुक्त पराग जैन, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग व लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर उपस्थित होते.