....
नवीन वस्ती खापा
खापा : येथील नवीन वस्ती येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ठाणेदार अजय मानकर, भारत मुक्ती माेर्चाचे तालुकाप्रमुख लेखराज शेंडे, पवन लांबट, राजू कडू, अशोकसिंग ठाकूर, गोलू पाल, शेखर साळवे, श्याम गजभिये, रोशन अंतुरकर, रवी तुमाने उपस्थित होते.
...
विविध सामाजिक संघटना हिंगणा
हिंगणा : येथील मुख्य महामार्गावर बौद्ध नागरिक हक्क संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी
भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष, माजी जि. प. सदस्य अंबादास उके, पं. स. सदस्य सुरेश काळबांडे, युवा मोर्चा अध्यक्ष आदर्श पटले, विशाल भोसले, दादाराव मसराम, नरेंद्र बेहरे, किशोर बडवाईक, अजय थूल, संजना मून, विद्या पोहनकर, तेजराम मून, महानंदा मून आदी उपस्थित होते.