शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जयघोषाने अंबर गर्जले

By admin | Updated: September 16, 2016 03:10 IST

दहा दिवस घरी मुक्कामाला आलेल्या व आपल्या पावन सानिध्याने भाविकांच्या मनात नवे चैतन्य

बाप्पांना निरोप : तलावांवर भाविकांची गर्दी, गुलालाची उधळण अन् तरुणाईचा जल्लोष नागपूर : दहा दिवस घरी मुक्कामाला आलेल्या व आपल्या पावन सानिध्याने भाविकांच्या मनात नवे चैतन्य पेरणाऱ्या बाप्पांना आज गुरुवारी अनंत चतुर्दशीला नागपूरकरांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. शहरातील गांधीसागर, फुटाळा, सक्करदरा, नाईक तलाव,पोलीस लाईन तलावाच्या काठावर धूपबत्तीचा स्वर्गीय दरवळ अन् आरतीच्या गजरात बाप्पांचे मोहक रूप डोळ्यात साठवून मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् तरुणाईचा जल्लोष पाहण्यासारखा होता. शहरातील जलाशयांकडे जाणाऱ्या प्रमुख विसर्जन मार्गांना तर जणू जत्रेचे स्वरूप आले होते. घरगुती व सार्वजनिक गणपतींना तलावाकडे घेऊन येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा सर्वत्र दिसत होत्या. नागपुरातील फुटाळा तलावावर सकाळी ९ वाजतापासून सर्वप्रथम घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. कुणी सायकलवर, कुणी सायकलरिक्षामध्ये बसून तर कुणी कारमधून बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन आले होते. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषाने अवघे शहर दणाणून गेले. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा गर्जनेत आबालवृद्धांच्या उत्साहाने जणू भक्तीचा महापूर ओसंडूून वाहत होता. लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर तो गावाला जात असल्याने अखेरच्या सेल्फीसाठी अनेक भक्तांची धडपड सुरू होती. काहींनी बाप्पाच्या आरतीच्या वेळी तर काहींनी अगदी सूर्यास्ताच्या क्षणी किनाऱ्यावर अखेरचा निरोप देताना सेल्फी स्टीक घेऊन तो क्षण आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला. रिद्धी-सिद्धीसह बुद्धीचा देवता असलेल्या बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरला. त्याचे आगमनच जीवनातील दु:ख दूर करते, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या अनेक गणेशभक्तांनी यावेळी व्यक्त केली. बाप्पाला अखेरचा निरोप देऊन विघ्न दूर कर बाप्पा, अशी मनोकामना करीत भाविकांनी परतीचा मार्ग धरला. मोजक्या पण जागरूक नागरिकांचा प्रतिसाद ४गणेश विसर्जनप्रसंगी पर्यावरण सुरक्षेच्यादृष्टीने थोडे निराश करणारे वातावरण आज शहरातील सर्वच तलावांवर दिसले. पण, यातही काही सन्मानजनक अपवाद होतेच. पर्यावरणप्रेमी संस्था, महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मोजक्या पण सामाजिक कर्तव्याप्रति जागरूक नागरिकांनी तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन न करता पर्यायी कुंडांत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. मूर्तीसोबतचे निर्माल्यही आवर्जून स्वयंसेवी संस्थांच्या हवाली केले.