कामठी : नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत कंटेनरमधून करण्यात येणारी जनावरांची तस्करी पोलिसांनी पकडली. मिळालेल्या माहितीनुसार नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रात्री गस्तीवर असताना एका कंटेनरमध्ये जनावरे आणण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या आधारावर पोलिसांनी लिहीगाव पुलाजवळ वाहनांची तपासणी केली. दरम्यान, त्यांना १२ चाकी पांढऱ्या रंगाचा लॉजिस्टिक कंटेनर (क्रमांक एम.पी.०७-एच.बी. १९९५) येताना दिसला. पोलिसांनी कंटेनर थांबवून तपासणी सुरू केली असता, कंटेनरमध्ये ६० जनावरे दिसून आली. पोलिसांनी या कंटेनरला ताब्यात घेऊन फरार कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या कारवाईत २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, वेदप्रकाश यादव, श्रीकांत भिष्णुरकर, मंगेश गिरी, आशिष मुरंकुडे, पप्पू यादव, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकलीकर, मंगेश यादव, सुधीर कनोजिया आदींनी केली.
जनावरांनी भरलेला कंटेनर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:11 IST