शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आणीबाणी लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न

By admin | Updated: August 27, 2016 02:17 IST

महाराष्ट्र सरकारने नुकताच महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी हा नवा कायदा अमलात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.

विजय वडेट्टीवार : महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी कायद्याला विरोध नागपूर : महाराष्ट्र सरकारने नुकताच महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी हा नवा कायदा अमलात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. या कायद्याद्वारे सामान्य माणसाचा जगण्याचा हक्क हिरावण्याचा बेत आहे. लोकशाही असलेल्या देशात सरकार विरोधकांचाच नव्हे तर सामान्य माणसांचाही आवाज दाबण्याच्या प्रयत्नात आणीबाणी लागू करीत आहेत, असा घणाघाती आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. वडेट्टीवार म्हणाले, कायद्यातील अटी सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणाऱ्या आहेत. यातील तरतुदीनुसार कोणत्याही मागणीसाठी, सरकारविरोधात मोर्चा काढण्यासाठी वा एखाद्या समारंभासाठी १०० पेक्षा जास्त लोक एकत्र येत असल्यास पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. एखाद्याच्या घरी लग्नापासून अंत्ययात्रेपर्यंत कोणत्याही समारंभात १०० पाहुणे येणार असतील तर त्यांची नावांसह यादी पोलिसांना द्यावी लागेल़ त्यापेक्षा जास्त लोक आले तर तो गुन्हा ठरेल़ परवानगी न घेता आंदोलन केले तर आंदोलन करणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकले जाईल़ आंदोलनकर्त्यांना दहशतवादी ठरवून कारवाई करण्याचीही भीती आहे. तीन वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात आहे़ पोलिसांना कायदेभंगाचा संशय आला तर थेट तुरुंगात टाकण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. या कायद्यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकारी मिळतील व यातून भ्रष्टाचार फोफावेल असा, असा धोका वडेट्टीवार यांनी वर्तविला. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे़ सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात मोर्चा काढता येतो़ मात्र या कायद्याच्या माध्यमातून सरकार हा अधिकारही काढून घेत आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांसह सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकार हा नवा कायदा करीत आहे़ मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून तो प्रसिद्धही करण्यात आला आहे़ संख्याबळाच्या आधारावर कायदा मंजूर करण्याचा भाजपचा डाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले़ पत्रपरिषदेला काँग्रेसचे नेते रवींद्र दरेकर, किशोर जिचकार आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांना पत्र देऊयापूर्वी सरकारने राजकीय नेत्यांवर टीका करणे देशद्रोह ठरेल असे परिपत्रक काढले होते़ तो डाव फसल्यामुळे आता जनतेचा असंतोष चिरडण्यासाठी नव्या कायद्याचा घाट घातला जात आहे़ काँग्रेस पक्षाच्या वतीने या कायद्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. पक्षातर्फे कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देणार आहोत. गरज पडल्यास याविरोधात जनआंदोलन उभारू आणि विधिमंडळात आणि रस्त्यावर लढा दिला जाईल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. आक्षेप मागविणे केवळ फार्सराज्य सरकारने कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी नागरिकांकडून आक्षेप मागविले आहेत. मात्र अशाप्रकारे केवळ आक्षेप मागवायचे आणि आपल्या मनाप्रमाणे कायदे करायचे, असे धोरण सरकारने चालविले आहे. आक्षेप मागविणे हा केवळ सरकारचा दिखावा असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. नीतेश राणेंच्या भूमिके शी पक्षाचा संबंध नाहीस्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी नुकतीच नागपुरातील दौऱ्यात विदर्भवाद्यांवर हल्लाबोल करीत अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवाद्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली होती. याविषयी विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले, नीतेश राणे यांचे वक्तव्य व्यक्तिगत आहे. त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाशी संबंध नाही.