शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सरकार परतणार अन् निवडणूक रंगणार

By admin | Updated: November 25, 2015 07:03 IST

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ७ डिसेंबर पासून ते साधारणत: २४ डिसेंबरपर्यंत ‘सरकार’चा नागपुरात

नागपूर : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ७ डिसेंबर पासून ते साधारणत: २४ डिसेंबरपर्यंत ‘सरकार’चा नागपुरात मुक्काम असेल. अधिवेशन संपताच सरकार मुंबईला रवाना होईल. अधिवेशनाची धामधूम शांत होईल अन् विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीची रंगत चढेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहजिल्ह्यात होत असलेली ही निवडणूक दोन्ही नेते अतिशय गांभीर्याने घेतील यात शंका नाही. भाजपमध्ये इच्छुकांची रांग मोठी असली तरी दोन्ही नेत्यांच्या समन्वयातूनच उमेदवार ठरणार आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र मुळक यांच्याशिवाय दुसरे मोठे नाव चर्चेत नाही. २७ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विजयी होणाऱ्या उमेदवाराला थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन जोरात करण्याचा योग आहे. मंगळवारी निवडणुकीची तारीख जाहीर होताच इच्छुक उमेदवार बऱ्यापैकी सक्रीय झाले. मतदारांनी इच्छुक उमेदवारांना फोन करून उमेदवारीसाठी शुभेच्छाही दिल्या. सर्वाधिक फोनाफानी भाजपमध्ये झाली. उमेदवारीसाठी असलेली स्पर्धा पाहता भाजप नेत्यांनाही विचारपूर्वक निर्णय घ्याला लागणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरलेले माजी आ. अशोक मानकर यांना फक्त चार मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी भाजपचे संख्याबळ तब्बल ५८ ने जास्त होते. मात्र, मानकर यांंच्यासोबत पक्षांतर्गत मोठा दगाफटका झाला. काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांचा गनिमीकावा कामी आला. विशेष म्हणजे यापूर्वीच्या निवडणुकीत मानकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव घारड यांना काँग्रेसचे संख्याबळ जास्त असतानाी पराभूत केले होते.एकूण मतदार ५८१ या वेळी नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषद व नगर पंचायतीच्या सदस्यांना मताधिकार देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात मौदा, महादुला, हिंगणा, कुही व भिवापूर या पाच नगर पंचायती नव्याने स्थापन झाल्या आहेत. येथे प्रत्येकी १७ सदस्य आहेत. त्यामुळे नगर पंचायतीचे ८५ सदस्य वाढले. कन्हान व वाडी या दोन नगर परिषदा स्थापन झाल्या. कन्हानमध्ये २५ तर वाडीमध्ये १७ सदस्य आहेत. यांची एकूण ४२ मतांची भर पडली आहे. याशिवाय नगर परिषद व मौदा, महादुला या नगर पंचायतीमधील नामनिर्देशित सदस्य असे एकूण २९ सदस्यांना मताधिकार दिला जाणार आहे. ही सर्व गोळा बेरीज करता मतदारसंख्या ५८१ वर पोहचेल