शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने थकवले वकिलाचे पारिश्रमिक

By admin | Updated: October 19, 2015 02:50 IST

शासनाने पारिश्रमिक थकविल्यामुळे एका सहायक सरकारी वकिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

हायकोर्टाची नोटीस : कर्करोगावर उपचारासाठी गरजनागपूर : शासनाने पारिश्रमिक थकविल्यामुळे एका सहायक सरकारी वकिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आरोग्य संचालक व आरोग्य उपसंचालक नागपूर यांना नोटीस बजावून २१ आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.संतोष सूर्यवंशी असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते कर्करोगग्रस्त आहेत. त्यांचे २ लाख ५९ हजार रुपये पारिश्रमिक शासनाकडे थकित आहे. ही रक्कम १८ टक्के व्याजासह परत मिळावी, अशी त्यांची विनंती आहे. ते नागपुरातील न्यायालयांमध्ये १९९७ पासून वकिली व्यवसाय करीत आहेत. सात वर्षे व्यवसाय केल्यानंतर शासनाने त्यांची जिल्हा न्यायालयासाठी विधी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. २३ जून १९९८ रोजी परिपत्रक जारी करून जिल्हा सरकारी वकील व सहायक सरकारी वकील यांचे ३५०० रुपये प्रति प्रकरण पारिश्रमिक निश्चित करण्यात आले आहे. सूर्यवंशी यांनी ५६ प्रकरणांची विस्तृत माहिती शासनाकडे सादर केली आहे. परंतु, या प्रकरणांचे पारिश्रमिक त्यांना अद्यापही मिळाले नाही. कर्करोगामुळे त्यांची अन्ननलिका काढून टाकण्यात आली आहे. यावर मोठा खर्च झाला आहे. पारिश्रमिक मिळण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहिले पण, त्याचा काहीच फायदा झाला नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अरुण पाटील तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)