शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने त्वरित द्यावा

By admin | Updated: April 9, 2017 02:38 IST

राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली असून,

दीक्षाभूमीचा विकास निधी बुद्धिस्ट सर्किटसाठीही प्रयत्न अपुरे : सुलेखा कुंभारे यांची मागणी नागपूर : राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली असून, त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. अ दर्जाच्या मानकानुसार विकास करण्यासाठी आवश्यक निधीची शिफारसही केंद्राकडे केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत विकासाचा कुठलाही निधी केंद्र सरकारकडून आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रस्तावाकडे लक्ष देउन तातडीने दीक्षाभूमीचा विकास निधी वळता करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका व माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी केली. शनिवारी त्यांनी एका पत्रपरिषदेदरम्यान विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. दीक्षाभूमी हे जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी एक पवित्र स्थान आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायी दरवर्षी येथे भेट देतात. त्यामुळे दीक्षाभूमीला आंतरराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन त्यानुसार विकास करणे गरजेचे आहे. अनेक देशांतील स्कॉलर भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धाचा अभ्यास करायला येतात. त्यामुळे दीक्षाभूमीवर आंतरराष्ट्रीय स्टडी आणि रिसर्च सेंटर स्थापन करण्यात यावे तसेच ग्रंथसंपदेसाठी अत्याधुनिक लायब्ररी स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे राज्य सरकारने नागपूरच्या क्षेत्रातील दीक्षाभूमीसह ड्रॅगन पॅलेस कामठी, चिचोली, फेटरी आदी पर्यटन स्थळांना मिळून बुद्धिस्ट सर्किट स्थापण्याची घोषणा केली होती. मात्र त्याबाबतही पुरेसे प्रयत्न होताना दिसत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीवर येणार असल्याने त्यांनी या प्रस्तावांकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी अ‍ॅड. कुंभारे यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेला बरिएमच्या नगरसेविका वंदना भगत, भीमराव फुसे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी) बरिएमचा स्थापना दिवस ११ ला येत्या ११ एप्रिल रोजी बहुजन रिपब्लिकन एकता मंचचा अकरावा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त महोत्सवास शुभारंभ करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी यावेळी सांगितले. यानिमित्त महापौर नंदाताई जिचकार, नवनियुक्त नगरसेविका वंदना भगत तसेच बरिएमच्या कामठीतील नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे नेते तसेच बहुजन समाजातील विविध संघटनांचे नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.