शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून शाळा उघडण्याची घाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसतानादेखील काही राज्यामध्ये शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसतानादेखील काही राज्यामध्ये शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काय निर्णय घेतला जातो, याकडे पालक-विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र यासंदर्भात राज्य सरकार कुठलीही घाई करणार नाही, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी नागपुरात आले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

केरळनंतर महाराष्ट्रातदेखील काही जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात जेव्हा शाळा सुरू करण्याबाबत विचार होतो, तेव्हा संसर्ग वाढायला लागतो. शिक्षण महत्त्वाचे आहे, मात्र आरोग्याची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. येत्या दोन दिवसात सरकार याबाबतीत ठोस निर्णय घेईल, असे कडू यांनी सांगितले. त्यांनी विधान परिषदेत आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या दवाबात राज्यपाल काम करीत आहेत. राज्य शासनाने राज्यपालांना १२ नावे पाठविली आहेत. जर नियमानुसार नाव पाठविण्यात आले नाही, असे वाटत असेल तर राज्यपालांनी यादी नाकारावी. मात्र भाजपला सत्तेची स्वप्न अजूनही पडत आहेत व त्यांच्या कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येईल, असे त्यांना वाटत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यासंदर्भात राज्यपालांना विचारणा करीत आहेत, परंतु ते कुठलाही निर्णय घेत नाहीत. याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी कडू यांनी केली. राज्यात जो कुणी भाजपविरोधात बोलत आहे, त्याला ईडीचा सामना करावा लागत आहे. भाजपने ईडीला राजकीय शस्त्रच बनविले आहे. भाजपच्या नेत्यांवरदेखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, मात्र त्यांची चौकशी होत नाही, असेदेखील कडू म्हणाले.