शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी दस्तऐवज ‘हायजॅक’

By admin | Updated: August 24, 2015 02:42 IST

केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत महाराष्ट्रात नागपूर, पुणे व मुंबई येथे १९९६ ला दत्तक समन्वय संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या.

इशारा देऊनही शासनाकडून दखल नाही : पाच हजारावर दत्तक बालकांचा डाटा वाऱ्यावरमंगेश व्यवहारे नागपूरकेंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत महाराष्ट्रात नागपूर, पुणे व मुंबई येथे १९९६ ला दत्तक समन्वय संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या. २०१२ मध्ये ही संस्था बंद करण्यात येऊन बालसंरक्षण योजनेच्या माध्यमातून बालसंरक्षण कक्ष महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात स्थापन करण्यात आले. दत्तक समन्वय संस्थेच्या कर्मचाऱ्यांना यात सामावून घेण्याचे आदेश केंद्राच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने राज्याच्या महिला व बालकल्याणला दिले होते. मात्र राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना सामावून न घेतल्याने या कर्मचाऱ्यांनी १६ वर्षांत केलेल्या कामाचा सरकारी डाटा हायजॅक केला आहे. दत्तक संस्थांमध्ये समन्वय राहावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दत्तक समन्वय संस्थांची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने देशभरात दत्तक समन्वय संस्था स्थापन केल्या. महाराष्ट्रात तीन ठिकाणी संस्थेची स्थापना करण्यात आली. नागपुरातील दत्तक समन्वय संस्था विदर्भातील अनाथालयाशी जुळलेल्या होत्या. अनाथ मुलांना पालकत्व मिळवून देणे, विदेशात दत्तक गेलेल्या बालकांची नोंद ठेवणे, आढावा घेणे. त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर क रणे, दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांची नोंद ठेवून बालक उपलब्ध करून देणे, हे कार्य समन्वय संस्थेचे होते. गेल्या १६ वर्षांत नागपूरच्या संस्थेने ५,०२५ अनाथ बालकांना पालकत्व मिळवून दिले. ४३२ बालकांना विदेशात दत्तक दिले. या सर्वांचा डाटा संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडे आजही आहे. दत्तक समन्वय संस्था बंद केल्यानंतर नागपुरातील कर्मचाऱ्यांना जिल्हा बालसंरक्षण कक्षात सामावून न घेतल्याने, सर्व दत्तक बालकांचा डाटा या कर्मचाऱ्यांनी स्वत:जवळ ठेवला आहे. यासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाला सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. (प्रतिनिधी)