शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या निर्देशांचे पालन करण्यास शासन कटिबद्ध

By admin | Updated: August 27, 2016 02:06 IST

राज्यपालांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यास आम्ही (शासन) कटिबद्ध आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर : राज्यपालांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यास आम्ही (शासन) कटिबद्ध आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. अमरावती महसूल विभागात सिंचन खात्यातील सर्व रिक्त जागा चार महिन्यात भरा आणि मागील तीन वर्षात विकास निधीचे वाटप ज्या प्रमाणात झाले, त्या प्रमाणात खर्च झाला किंवा नाही, याची माहिती जुलै २०१६ पर्यंत सादर करा. त्याची पुस्तिका काढा, असे राज्यपालांनी ११ मार्च २०१६ रोजी सरकारला सांगितले होते. आता पाच महिने होत आहेत. परंतु अमरावती विभागातील सिंचन विभागात अजूनही ३३ टक्के पदे रिक्त आहेत आणि विकास निधी खर्च झाल्याबाबतची माहिती सरकारने अजूनही दिलेली नाही. त्यामुळे फडणवीस सरकारही राज्यपालांच्या निर्देशांबाबत उदासीन असल्याची टीका विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक आणि विदर्भ विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य अ‍ॅड. मधुकरराव उपाख्य मामा किंमतकर यांनी केली होती. तसेच तेलंगणासोबत झालेल्या करारासंदर्भात महाराष्ट्रातील कामे तेलंगणाप्रमाणे तीन वर्षात होतील का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांच्या निर्देशांचे पालन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगत नागपूरच्या माझ्या पुढील भेटीत मी मामा किंमतकर यांची भेट घेईन आणि प्रश्न समजून घेऊन तो तत्काळ सोडविन, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)