शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गोरेवाडा प्रकल्पाला दोन कोटींचे ‘बुस्ट’

By admin | Updated: September 3, 2014 01:19 IST

उपराजधानीतील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘रेस्क्यू सेंटर’ च्या बांधकामासाठी राज्य सरकारने अलीकडेच २ कोटी ९ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

रखडलेल्या कामाला वेग येणार : एफडीसीएमच्या खात्यात निधी जमा नागपूर : उपराजधानीतील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘रेस्क्यू सेंटर’ च्या बांधकामासाठी राज्य सरकारने अलीकडेच २ कोटी ९ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे, निधीअभावी गत काही दिवसांपासून येथील बांधकाम थंडबस्त्यात पडले होते. परंतु हा निधी मिळाल्याने त्या कामाला पुन्हा गती मिळणार आहे. वन विकास महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, राज्य सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी २ कोटी ९ लाखांचा निधी एफडीसीएमच्या खात्यात जमा केला आहे. माहिती सूत्रानुसार एफडीसीएमने येथील रेस्क्यू सेंटरच्या बांधकामाची सार्वजनिक बांधकाम विभागावर (पीडब्ल्यूडी) जबाबदारी दिली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा येथील एका खाजगी कंत्राटदाराच्या मदतीने येथील बांधकाम करीत आहे. परंतु या सेंटरच्या बांधकामासाठी आलेला निधी अचानक संपल्याने, गत काही दिवसांपासून संबंधित ठेकेदाराने काम बंद केले होते. गोरेवाडा प्रकल्प हा नागपूरच्या विकासातील मैलाचा दगड मानल्या जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. गत दोन वर्षांपूर्वी स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते येथील नैसर्गिक पायवाट व रेस्क्यू सेंटरचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या अश्वासनाची पूर्तता करीत, आजपर्यंत वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळेच येथील सुरक्षा भिंत व निसर्ग पायवाटीचे काम झपाट्याने पूर्ण होऊन, रेस्क्यू सेंटरच्या बांधकामालाही वेग आला आहे. (प्रतिनिधी)