शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

महिन्यात सोने तीन हजारांनी गडगडले!

By admin | Updated: May 30, 2014 01:14 IST

एनडीएची बहुमतातील सरकार आणि रिझर्व्ह बँकेने सोने आयातीच्या नियमात शिथिलता आणल्याने देशातील सराफा बाजारात सोने स्वस्त झाले. यावर्षी आतापर्यंंंतची सर्वात मोठी घसरण आहे.

ग्राहकांचा अभाव : दर आणखी उतरण्याची अपेक्षामोरेश्‍वर मानापुरे - नागपूरएनडीएची बहुमतातील सरकार आणि रिझर्व्ह बँकेने सोने आयातीच्या नियमात शिथिलता  आणल्याने देशातील सराफा बाजारात सोने स्वस्त झाले. यावर्षी आतापर्यंंंतची सर्वात मोठी घसरण  आहे. दीड वर्षात सोन्यात ६६00  रुपये तर मे महिन्यात सोने तीन हजार रुपयांनी गडगडले.  सोन्याच्या झळाळीला उतरली कळा असली तरीही ग्राहकांसाठी ही शुभ वार्ता आहे. याआधी १७ एप्रिल २0१३ रोजी शुद्ध सोन्याच्या दरात २६,५९0 रुपयांपर्यंंंत घसरण झाली होती.  गेल्यावर्षी ही सर्वात मोठी घसरण होती. याउलट २६ नोव्हेंबर २0१२ रोजी १0 ग्रॅम शुद्ध सोन्याने  ३२,९२५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यादिवसापासून ते २९ मे २0१४ पर्यंंंत अर्थात दीड  वर्षात सोने ६६00 रुपयांनी कमी झाले. सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात  किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. सोन्यात होणार्‍या चढउतारामुळे लोकांनी  सोन्यात गुंतवणूक थांबविली आहे. माहितीनुसार यावर्षी १ जानेवारीला १0 ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर  २९,६१५ रुपयांवर होते. १ फेब्रुवारीला ३0 हजार, १ मार्चला ३0,७५0 रुपये, १ एप्रिलला  २८,९00 रुपये आणि १ मे रोजी सोन्याचे दर ३0,५२५ रुपयांवर होते. चालू आर्थिक वर्षात  सोन्याला मागणी फारच कमी राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंंंत  सोन्याचे दर खालीच राहील, असा निष्कर्ष आहे. दरम्यान, लग्नसराई आणि सोने याचे नाते अतूट  असल्याने सोने खरेदी करणार्‍यांसाठी दिलासा देणारी ही बाब आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर कमकुवत झाला तर गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय वापरला जातो.  त्यामुळे सोन्याची मागणी वाढून दरही वाढतात. आता अमेरिका आणि युरोपीय देशांची आर्थिक  स्थिती सुधारू लागली असून रुपया उच्चांकावर गेला आहे. सोने २६ हजारावर स्थिरावणार!आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीनुसार देशात सराफा बाजारपेठेत सोन्याचे दर २६ हजारांवर  स्थिरावतील, असा अंदाज आहे. सोन्याचे दर उतरतात तेव्हा ग्राहक दर आणखी कमी होतील, या  अपेक्षेने बाजाराकडे पाठ फिरवितात. याउलट दर वाढतात तेव्हा ते खरेदीसाठी गर्दी करतात. कमी  दरात खरेदी केल्याचा आनंद ग्राहकांच्या चेहर्‍यांवर झळकत असतो. सध्या ग्राहकांसाठी खरेदीची  उत्तम संधी असल्याची प्रतिक्रिया करण कोठारी ज्वेलर्सचे संचालक प्रदीप कोठारी यांनी  लोकमतशी बोलताना दिली. उतरणीचा क्रम सुरूच राहीलगुंतवणूकदारांसाठी सोने हा तितका आकर्षक पर्याय राहणार नाही. त्यामुळे सोन्याचे भाव आणखी  गडगडण्याची शक्यता आहे. स्थानिक स्तरावर सोने जागतिक बाजारातील किमतीनुसार स्वस्त  होईल, अशी माहिती सराफांनी सांगितले.  आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीनुसार दिवाळीपर्यंंंत  सोन्याचे दर आणखी तीन ते चार हजार रुपयांनी कमी होण्याची शक्यता इंडिया रेटिंग्ज अँण्ड  रिसर्च संस्थेने व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी घटली आहे. जगात  भारतातच सोन्याला जास्त मागणी आहे. ग्राहकांची ‘वेट अँण्ड वॉच’ची भूमिका आहे. सोन्याच्या गुंतवणुकीत परतावा कमीगेल्या दीड वर्षात सोन्यात परतावा फारच कमी आहे. २0१0 मध्ये सोन्याने २८ टक्के आणि  २0११ मध्ये सर्वाधिक ३७ टक्के परतावा दिला होता. २0१२ मध्ये तो १0 टक्क्यांपर्यंंंत खाली  आला. सोन्याचे दर कमी झाल्याने महागाईपासून काही प्रमाणात सामान्य गुंतवणूकदारांना दिलासा  मिळाला आहे. चांदीत २२,४00 रुपयांची घसरणसोन्यासोबत चांदीच्या दरातही मोठय़ा प्रमाणात घसरण सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत आठ  हजारांची घसरण होऊन चांदीचे दर २९ मे रोजी ४0,९00 रुपयांवर स्थिरावले. याआधीची  आकडेवारी पाहता २६ नोव्हेंबर २0१२ रोजी औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढल्यानंतर चांदी  ६३,३00 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली होती. अर्थात दीड वर्षात चांदीत २२,४00 रुपयांची  घसरण झाली. सध्या चांदीला मागणी नसल्याचे सराफांनी सांगितले.  (प्रतिनिधी)