शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

सोने ८७५ रुपयांनी घसरले

By admin | Updated: June 2, 2014 02:14 IST

जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत दिसून येत आहे.

नागपूर : जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत दिसून येत आहे. भाव आणखी कमी होतील, या अपेक्षेने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली. शिवाय कॉर्पोरेट क्षेत्राकडून मागणी नसल्याने गेल्या आठवड्यात १0 ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ८७५ रुपयांनी कमी झाले. पुढील आठवड्यात सोन्याचे भाव २७ हजारांच्या आत येतील, अशी शक्यता सराफांनी वर्तविली.

गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच सातही दिवस सोन्यात घसरण झाली. स्थानिक सराफा बाजारात सोमवारी शुद्ध सोने २५ रुपयांची घसरले. मंगळवारी पुन्हा घसरण होऊन भावपातळी २८,१५0 रुपयांवर स्थिरावली. आंतरराष्ट्रीय घडामोडीनुसार बुधवारीसुद्धा सोन्यात तब्बल ३५0 रुपयांची घसरण झाली. यादिवशी भाव पहिल्यांदाच २८ हजारांच्या आत आले. सोन्यात सुरू असलेली घसरण गुरुवार, २९ मे रोजी सुरूच होती. यादिवशी शुद्ध सोने २00 रुपयांनी उतरले. शुक्रवारीही ५0 रुपयांनी कमी होऊन २७,५५0 रुपयांत विक्री झाली. शनिवारी बाजार बंद होतेवेळी सोने १00 रुपयांनी कमी झाले. त्यादिवशी २४ कॅरेट सोन्याचे भाव २७,४५0 रुपये, २३ कॅरेट २७,२00 आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव २६,९५0 रुपयांपर्यंंत खाली आले. वर्षभरापूर्वी शुद्ध सोने २६,६00 रुपयांपर्यंंत खाली उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. या पातळीपर्यंंत सोने खाली उतरेल, अशी ग्राहकांना अपेक्षा आहे. ग्राहकांना खरेदी करता येईल, एवढी पातळी सोन्याने ओलांडली आहे. ग्राहकांनी खरेदीसाठी पुन्हा वाट पाहू नये, असे सराफांनी सांगितले. याशिवाय शुद्ध चांदी किलोमागे ११00 रुपयांनी कमी होऊन भाव ४0,८00 रुपयांवर पोहोचले. पुढील आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात घट होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. सोन्यात आणखी घसरण होईल, या अपेक्षेने ग्राहकांनी खरेदी थांबविली आहे. याशिवाय लग्नसराईची खरेदी संपल्याने बाजारात ग्राहकी कमी आहे. (प्रतिनिधी)