शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गोदरेज आनंदम फ्लॅटधारकांचा कोट्यवधी रुपये भरपाईचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST

नागपूर : गणेशपेठ येथील गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटी टाऊनशीपमधील फ्लॅटधारकांच्या आनंदम टॉवर ‘सी’ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुनील चिरानिया ...

नागपूर : गणेशपेठ येथील गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटी टाऊनशीपमधील फ्लॅटधारकांच्या आनंदम टॉवर ‘सी’ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुनील चिरानिया यांनी कोट्यवधी रुपये भरपाई मिळण्यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे. त्यात आयोगाने गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर व गोदरेज प्रॉपर्टी कंपनीला नोटीस बजावून ३० दिवसात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर व गोदरेज प्रॉपर्टी कंपनीने गोदरेज आनंदम वर्ल्ड सिटी टाऊनशीपचे मार्केटिंग करण्यासाठी आकर्षक माहितीपत्रक छापले होते. तसेच, नागरिकांचे डोळे दिपवणाऱ्या जाहिराती केल्या होत्या. प्रकल्पामध्ये ग्रॅन्ड वॉटर बॉडी, सनराईज डेक, ट्रिविया कोर्ट, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, बॅडमिंटन कोर्ट, ट्री कोर्ट, पॅव्हिलियन, प्लन्टर्स, किडस् झोन, ॲम्फिथिएटर, लॅन्डस्केप ट्री, कमर्शियल प्लाझा, क्रिकेट पीच, टेनिस कोर्ट, वुडन डेक, ॲमेनिटीज एरिया इत्यादी आधुनिक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्याला भूलून तक्रारकर्त्यांनी २०१२ ते २०१६ या कालावधीत प्रकल्पातील फ्लॅट खरेदी केले. दरम्यान, कंपन्यांना फ्लॅटची संपूर्ण किंमत अदा केली. परंतु, कंपन्यांनी ठराविक वेळेत प्रकल्पाचे काम पूर्ण केले नाही. फ्लॅटधारकांना अद्यापही सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. क्लब हाऊसकरिता प्रत्येक फ्लॅटधारकांकडून १ ते ३ लाख रुपये घेण्यात आले. परंतु, क्लब हाऊसचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. फ्लॅटधारकांकडून २०० रुपये चौरस फुटाप्रमाणे एकमुस्त देखभाल खर्च घेण्यात आला. त्यापैकी १५० रुपये चौरस फूट या प्रमाणे रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचेही पालन करण्यात आले नाही असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्यांच्या वतीने ॲड. गिरीश कुंटे व ॲड. अनुभव मार्डीकर यांनी कामकाज पाहिले.

-----------------

तक्रारकर्त्यांच्या मुख्य मागण्या

१ - कंपन्यांनी प्रकल्पातील सर्व सुविधांचे काम पूर्ण करावे.

२ - संपूर्ण प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावा.

३ - क्लब हाऊसकरिता घेतलेल्या रकमेवर मासिक २ टक्के व्याज द्यावे.

४ - संस्थेच्या ३३ सदस्यांना प्रत्येकी ३० लाख रुपये भरपाई अदा करावी.

५ - पार्किंग, बेसमेंट, ओपन एरियामधील सांडपाण्याची गळती थांबवावी.