शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने बकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : अचानक तुटलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने तीन बकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : अचानक तुटलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने तीन बकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील येरला येथील कळमेश्वर-आष्टी मार्गालगत शुक्रवारी (दि. ९) दुपारी घडली.

ईश्वर भाकरे, रा. येरला, ता. कळमेश्वर हे बकरी पालनाचा व्यवसाय करीत असून, ते शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्यांच्या बकऱ्या कळमेश्वर-आष्टी मार्गाने चारायला घेऊन जात हाेते. यातील काही बकऱ्या पुढे हाेत्या तर काही मागे हाेत्या. पुढे असलेल्या बकऱ्यांपैकी तीन बकऱ्या तडफडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जवळ जाऊन बघितले असता, त्या बकऱ्यांना विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा धक्का लागला हाेता. शिवाय, ती तार. नुकतीच तुटून खाली पडली हाेती.

या ठिकाणाहून राेज नागरिकांसह त्यांच्या जनावरांचा राबता असताे. त्यामुळे विजेच्या या तारा धाेकादायक बनल्या आहे. यात आपले ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती ईश्वर भाकरे यांनी दिली. यासंदर्भात आपण महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून याेग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.