शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा स्पेशल नागपूर की मुंबईकरांसाठी ?

By admin | Updated: April 17, 2017 02:06 IST

अजनी-मडगाव रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी : दोन सुट्या वाया गेल्यानंतर सोमवारी सुटते गाडी

अजनी-मडगाव रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी : दोन सुट्या वाया गेल्यानंतर सोमवारी सुटते गाडी दयानंद पाईकराव  नागपूर प्रायोगिक तत्त्वावर २६ जानेवारी आणि २५ फेब्रुवारीला मडगावसाठी सोडलेल्या विशेष रेल्वेगाड्यांना प्रतिसाद मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ३ एप्रिल ते ५ जून दरम्यान प्रत्येक सोमवारी अजनी-मडगाव स्पेशल रेल्वेगाडीची घोषणा केली. बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवारी सुटी असते. परंतु ही गाडी सोमवारी सोडण्यात येत असल्यामुळे त्यांच्या दोन दिवसाच्या सुट्या वाया जात असून ही गाडी नागपूरकरांसाठी सुरू करण्यात आली की मुंबईकरांसाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी २६ जानेवारीला नागपूरवरून मडगावसाठी विशेष रेल्वेगाडी सोडली होती. या गाडीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर २५ फेब्रुवारीला पुन्हा नागपूर-मडगाव ही रेल्वेगाडी सोडली होती. या गाडीलाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या दोन्ही गाड्या सकाळी ८ वाजता नागपूरवरून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळीच मडगावला पोहोचत होत्या. यामुळे सकाळी उतरून हॉटेल बुक केले की दिवसभर गोवा भ्रमंती करण्यासाठी विदर्भातील पर्यटकांना वेळ मिळत होता. परंतु ३ एप्रिल ते ५ जून दरम्यानच्या अजनी-मडगाव या गाडीचा दिवस आणि वेळ नागपूरकरांच्या नव्हे तर मुंबईकरांच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याची ओरड होत आहे. ही गाडी सोमवारी सायंकाळी ७.५० वाजता सुटून मडगावला मंगळवारी रात्री ९.३० वाजता पोहोचते. रेल्वे प्रशासनातर्फे १ जुलैपासून नवे वेळापत्रक जारी करण्यात येते. या वेळापत्रक अजनी-मडगाव ही गाडी नियमित करून दिवसात बदल करावा. नागपूरकरांना लवकर गोव्याला पोहोचता यावे यासाठी ही गाडी योग्य मार्गावर चालविण्यासाठी प्रयत्न करावा. नागपूरकरांच्या दोन दिवसांच्या सुट्या वाया जाऊ नयेत यासाठी भारतीय यात्री केंद्राने रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिले आहे.’ - बसंत कुमार शुक्ला, सचिव भारतीय यात्री केंद्र स्पेशल रेल्वेगाड्यांचा दिवस आणि वेळ मुंबई मुख्यालयातून निश्चित करण्यात येतो. एखादी गाडी नागपूर आणि मुंबई दोघांच्याही दृष्टीने सोईस्कर ठरू शकत नाही. त्यासाठी उपलब्ध असलेले रॅक, मार्ग आणि इतर बाबी तपासून संबंधीत गाडीची वेळ निश्चित करण्यात येते.’ -कुश किशोर मिश्र, ‘सिनिअर डीसीएम’, मध्य रेल्वे, नागपूर विभाग