शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

सुमनविहार, भिलगावला तात्काळ पाणी द्या

By admin | Updated: April 18, 2017 02:15 IST

सुमनविहार व भिलगाव या शहरालगत व कामठी तालुक्यात असलेल्या गावांना तात्काळ पाणी द्या.

पालकमंत्री : मनपा देणार सात लाख लिटर पाणीनागपूर : सुमनविहार व भिलगाव या शहरालगत व कामठी तालुक्यात असलेल्या गावांना तात्काळ पाणी द्या. सध्या एका टाकीला जोडून पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.उत्तर नागपुरातील वांजरा येथील पाण्याची टाकी पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही गावांना महापालिका पाणी देणार आहे. त्यासाठी सात लाख लिटर पाणी आरक्षित आहे. या टाकीचे काम नासुप्र करीत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी एक टाकी त्वरित जोडा. वांजरा टाकी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित टाक्यांना जोडण्यात येणार आहे. भिलगाव येथील २२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा मंजूर असून या कामाचे कार्यादेशही देण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)खापरी, शिवणगावात माफक दरात घरेमिहान प्रकल्पात जाणाऱ्या खापरी, शिवणगाव येथे प्रकल्पग्रस्तांना भूखंड आणि शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्यांसाठी माफक दरात घरांची योजना बांधण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.सुमारे ५०० घरे येथे बांधण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचे सहकार्य आणि मिहानच्या सहकार्याने या नागरिकांना ५०० चौ.फुटाचे घर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पुनर्वसनासाठी मिहानने त्वरित शासनाकडे पैसे भरले तर सेक्शन ४ ची कारवाई १५ दिवसात सुरू करता येईल, असेही पुनवर्सन विभागातर्फे सांगण्यात आले.सुरक्षा रक्षकांना नियमित वेतनमहावितरण अंतर्गत बुटीबोरी, सावनेर येथील सुरक्षा रक्षकांना त्यांचे थकीत असलेले वेतन येत्या तीन दिवसात देण्यात येईल. तसेच यापुढे नियमित वेतन मिळेल अशी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन या सुरक्षा रक्षकांना मिळालेले नाही, हे येथे उल्लेखनीय. ऊर्जामंत्र्यांनी मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून तीन दिवसात या रक्षकांचे वेतन देण्याचे निर्देश दिले.