शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

एफआयआर रद्दच्या याचिकेला जनहित याचिकेचे स्वरूप द्या

By admin | Updated: January 2, 2017 02:29 IST

पाचगाव वनक्षेत्रातील अवैध उत्खननप्रकरणी दाखल एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेला जनहित याचिकेचे स्वरूप द्यावे,

पाचगाव वनक्षेत्र अवैध उत्खनन प्रकरण : हायकोर्टाचे निर्देश नागपूर : पाचगाव वनक्षेत्रातील अवैध उत्खननप्रकरणी दाखल एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेला जनहित याचिकेचे स्वरूप द्यावे, असे निर्देश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती इंदिरा जैन यांच्या खंडपीठाने दिले. लक्ष्मणराव शेंडे,असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते नागपूर वनविभागांतर्गत पाचगाव बीटमध्ये क्षेत्र परीक्षक म्हणून कार्यरत होते. १५ जानेवारी २००६ रोजी ते निवृत्त झाले. दरम्यान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी एक परिपत्रक जारी करून असे नमूद केले होते की, एक वरिष्ठ अधिकारी १७ एप्रिल २००८ पर्यंत नागपूर वन विभागात वनसंरक्षक म्हणून कार्यरत होते. ३१ आॅक्टोबर २०१२ रोजी ते निवृत्त झाले. त्यांचा नागपूर वन विभागाचा कार्यकाळ निवृत्तीपासून ४ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा असून त्यांच्याविरुध्द नियमानुसार कारवाई करणे शक्य होणार नाही. यावर शेंडे यांचे म्हणणे असे की, आपण २००१ ते २००३ या कालावधीत पाचगाव बीटमध्ये कार्यरत होतो. १५ जानेवारी २००६ रोजी निवृत्त झालो. त्यामुळे आपल्यावर दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावा. याप्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, भगवाननगर येथील लक्ष्मणराव शेंडे हे उमरेड परिक्षेत्र वनविभागाचे उपक्षेत्र पाचगाव येथे २२ जून २००१ ते २७ जानेवारी २००३ पर्यंत क्षेत्र सहायक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते क्षेत्र सहायक होते. एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान ६ मे २०१५ रोजी हायकोर्टाने सरकारला असे निर्देश दिले होते की, २००२ ते २०१२ या काळात पाचगाव येथील वनविभागाच्या अधिनस्थ असलेल्या शासकीय जागेवर अवैधरीत्या गिट्टीचे उत्खनन झाल्याचे आणि त्यामुळे सरकारला २ कोटी ७५ लाख रुपये नुकसान झाल्याचे दिसून येते. या कालावधीत पाचगाव येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करून खातेनिहाय चौकशी करा. या निर्देशानंतर मुख्य वनसंरक्षकांनी ३ आॅगस्ट २०१५ रोजी घोटाळ्याशी संबंधित सात अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे परिपत्रक काढले होते. १० आॅगस्ट २०१५ रोजी सहायक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर यांनी कुही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच पोलिसांनी ७ अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. यात शेंडे यांचाही समावेश होता. शेंडेविरुध्द भादंविच्या ४०९, ३७९, ३४ व भारतीय वन अधिनियमाच्या कलम ३२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयात याचिकाकर्त्याच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)