शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

By admin | Updated: February 24, 2016 03:22 IST

राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. कापूस आणि सोयाबीनला सरकारने दिलेला हमीभाव उत्पादन खर्चाइतकाही नाही.

निरंजन डावखरे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विभागीय कार्यालयावर मोर्चानागपूर : राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. कापूस आणि सोयाबीनला सरकारने दिलेला हमीभाव उत्पादन खर्चाइतकाही नाही. दुष्काळाच्या परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनामार्फत केवळ आश्वासनांची खैरात वाटण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ठोस व भरीव मदत करण्यासाठी शासनाने येत्या बजेट अधिवेशनात शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी घोषित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी केली. अन्यथा राज्यभर आक्रमक आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही दिला.राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, नुकसानग्रस्त सोयाबीन, कापुस, धान व संत्रा पिकाला भरपाई देण्यात यावी, एपीएल कार्डवरील धान्य त्वरीत सुरू करावे, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती सुरू कराव्या, नागपूर शहरातील झोपडपट्टी धारकांना मालकीचे पट्टे देण्यात यावे, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारावी, यासह अन्य मागण्यांसाठी विभागीय मोर्चाचे आयोजन मंगळवारी प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. या मोर्चात आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सलील देशमुख, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, पंकज बोराडे, शैलेश मोहिते, आशिष नाईक, विलास झोडापे, संदीप कीटे, मुनाफ शेख, रिंकु पापडकर, किशोर तरोणे, नगरसेवक राजू नागुलवार, वेदप्रकाश आर्य, प्रवीण कुंटे, ईश्वर बाळबुधे, विशाल खांडेकर, वर्षा शामकुळे, रिजवान अन्सारी, रविकांत वरपे, राजेंद्र बढिये, साहिल सय्यद यांच्यासह नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. संविधान चौकात छोटेखानी सभा पार पाडल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सभेत आ. प्रकाश गजभिये यांनी सरकारवर ताशेरे ओढत हे सरकार विकासाच्या नावावर शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप केला. प्रवक्ता अतुल लोंढे यांनी हे सरकार उद्योगपतींना तारणारे आणि शेतकऱ्यांना मारणारे असल्याचा आरोप केला. गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, कापूस व धानाला भाव मिळालाच पाहिज, रोजगाराची संधी, संत्र्याला भाव या मागण्या मोर्चेकऱ्यांनी मोर्चा दरम्यान केल्या. मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने विभागीय उपायुक्त अप्पासाहेब धुळास यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.