शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दे वरची असा दे..

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

आपलं विद्यापीठ आज ९० वर्षांच झालं. नऊ दशकात विद्यापीठ कुठे आहे? कुणी काय मिळवलं, कुणी काय दिले... असे एक ना अनेक प्रश्न विद्यापीठात वावरणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असतीलही आणि नसतीलही !

जितेंद्र ढवळे - नागपूरआपलं विद्यापीठ आज ९० वर्षांच झालं. नऊ दशकात विद्यापीठ कुठे आहे? कुणी काय मिळवलं, कुणी काय दिले... असे एक ना अनेक प्रश्न विद्यापीठात वावरणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असतीलही आणि नसतीलही ! नागपूर विद्यापीठ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असा प्रवास करणाऱ्या या विद्यापीठाची स्थापना ४ आॅगस्ट १९२३ रोजी झाली. नऊ दशकात विद्यापीठ कसे घडले हा संशोधनाचा विषय आहे. मात्र हल्ली संशोधन ( पीएच.डी.) हा शब्द विद्यापीठात उच्चारावा आणि तो कोणत्या अर्थाने हाच मुळात ‘संशोधना’ चा विषय झाला आहे! विद्यापीठाची पीएच.डी. मिळवीत स्वत:च्या नावापुढे डॉक्टर ही बिरुदाविली मिरविणारे आपल्यासाठी नवे नाहीत. याप्रसंगी हा वादाचा विषय होईल! कारण नव्वदीत या प्रश्नावर चर्चा करणेही सोईचे ठरणार नाही. कुलगुरूंची खाण असलेल्या आपल्या विद्यापीठाला सध्या पूर्णवेळ कुलगुरू हवे आहेत. हा विषय आता हायकोर्टातही गेला आहे. हल्ली विद्यापीठात एखादा वाद झाला किंवा एखाद्या विषयावर मतभेद असेल तर प्रत्येकांनी हायकोर्टाचा मार्ग निवडला आहे. येथील व्यवस्थेवर लोकांचा विश्वास तर उडाला नाही ना! ९० वर्षांच्या विद्यापीठाच्या १०० व्या दीक्षांत समारंभात सतराशे विघ्न यावे, देशाच्या महामहीम राष्ट्रपतींनी ऐनवेळी येथे येण्याचे टाळावे, हा आमच्या विद्यापीठाचा इतिहास नाही. वर्तमानातील काही ‘भूतं’ याला जबाबदार असावीत. १९४२ च्या ‘चले जाव’ च्या चळवळीत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र पदवी दीक्षांत समारंभ आणि वंदेमातरम् चळवळीत भाग घेणाऱ्या उस्मानिया विद्यापीठातून निष्कासित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा धाडसी निर्णय घेणारे आमचे विद्यापीठ आहे. हा आमचा इतिहास आहे !संस्थाचालक आणि विद्यापीठ प्रशासनाच्या भांडणात १०० व्या दीक्षांत समारंभात विघ्न येणे, हे खरचं शोभनीय आहे का, संस्थाचालकांना वैतागून कुलगुरूंनी राजीनामा दिला का, कुलगुरूंचे मंत्रिमंडळ असलेल्या व्यवस्थापन परिषदेने त्यांना काम करू दिले नाही का, सिनेट बैठक नेहमीच वादळी का ठरते, विद्वत्त परिषदेचे निर्णय प्रशासनाच्या पचनी का पडत नाहीत, यासाठी सदस्यानाही कोर्टात जाण्याची भाषा का बोलावी लागते, विद्यापीठात काही पदावर तीच ती माणसं का, विद्यापीठातील पदभरती कुणी अडविली, कुणी म्हणतात आधीच अ‍ॅडव्हान्स घेऊन ठेवले आहेत, ते खर आहे का? इतकेच काय प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी विद्यापीठात प्राध्यापकांनी यावे, यासाठी नोटीस बजावावी लागते. का होते असे, यासाठी जबाबदार कोण? एकमेकांवर बोट दाखविण्याची ही वेळ नाही. यासाठी आपण सर्वच जबाबदार आहोत. स्वत:चे हित जोपासण्याच्या मोहात, एका कॉलेजचे दोन कॉलेज आणि दोनचे चार करण्यात आमची १० वर्षे गेली! आता पसारा वाढला पण कॉलेजमध्ये शिकविण्यासाठी प्राध्यापक नाही ! मग प्रवेश बंदी येणार नाही तर का ? कारण टोलेगंज बिल्डिंग आणि तिथे प्रवेशासाठी घेतले जाणार डोनेशन म्हणजे शिक्षण नाही. दहा वर्षांपूर्वी मालामाल स्थिती होती!