शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्तांना १०० कोटींचे पॅकेज द्या

By admin | Updated: August 22, 2015 03:11 IST

नागपुरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने नदीकाठावरील झोपडपट्टीवासीयांचे प्रचंड नुकसान झाले.

राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : पूर्व नागपूरचे हजारो पीडित सहभागीनागपूर : नागपुरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने नदीकाठावरील झोपडपट्टीवासीयांचे प्रचंड नुकसान झाले. पूर्व नागपुरातील नागनदीकाठावरील सर्वच वस्त्या जलमय झाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींचे मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. या मागणीसाठी पूर्व विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून हा मोर्चा काढण्यात आला होता. माजी आमदार दीनानाथ पडोळे, राजेश माकडे, ईश्वर बाळबुधे, सुधा जैन, महेंद्र भांगे, नरेंद्र जैन, विंकी वर्मा, दिनकर वानखेडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पूर्व विभागातील शास्त्रीनगर, हिवरीनगर, पडोळेनगर, पँथरनगर, कुंभारटोली, नंदनवन, भरतवाडा इत्यादी वस्त्यांना नागनदीला आलेल्या पुराचा फटका बसला होता. काहींची घरे पडली, तर काहींच्या घराच्या भिंतींना तडे गेले. राकाँ कार्यकर्त्यांनी वस्त्यांमधील हजारो लोकांचे रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक जोडून सर्व मदत अर्ज तहसिल कार्यालयात नेऊन दिले व चौकशी करून तात्काळ मदतीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. नागनदीचे खोलीकरण, मलनिस्सारण, रस्ते,पूल व संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी ५०० कोटी व नदी काठावरील नुकसानग्रस्त झोपडपट्टीवासीयांसाठी १०० कोटींचे विशेष पॅकेज मुख्यमंत्र्यांनी त्वरित जाहीर करावे, अशी मागणी अतुल लोंढे यांनी यावेळी केली. विजय रामटेके, डॉ. विशाल बनकर, आनंदी बावनकर, ढेलुराम सेलोटिया, राहुल कांबळे, विक्की कनोजे, रुद्र धाकडे, रवी यादव, अमन जैन, राजू पिल्लेवान, जगदीश मेश्राम, शंकर डाखोरे, मुन्नालाल हिंगणेकर, सतीश वर्मा, सुरेखा मेंढे, विजया मेश्राम, सुधा ठवरे आदी कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी विशेष मेहनत घेतली.(प्रतिनिधी)