शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप

By admin | Updated: March 13, 2017 02:29 IST

आरोग्य तपासणी करताना डॉक्टरने लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप एका रुग्ण तरुणीने (वय २३) लावला.

तपासणी करताना लज्जास्पद वर्तन : डॉक्टरने फेटाळला आरोप नागपूर : आरोग्य तपासणी करताना डॉक्टरने लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप एका रुग्ण तरुणीने (वय २३) लावला. त्यामुळे इमामवाडा पोलिसांनी रामबागमधील डॉ. पंकज पाटील (वय ३७) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप झाल्यामुळे पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले आहे. तक्रारकर्ती तरुणी अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. ती आणि डॉ. पाटील एकाच वस्तीत राहतात. तरुणीच्या तक्रारीनुसार, ती रामबागमधील केंद्रीय स्वास्थ्य योजना युनिट क्रमांक ५ मध्ये शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १२ च्या दरम्यान आरोग्य तपासणीसाठी गेली होती. तिचे वडीलही यावेळी सोबत होते. तपासणी करीत असताना डॉक्टरने नको त्या जागी आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला. बाहेर आल्यानंतर तरुणीने आपल्या वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे तरुणीचे वडील अन् डॉक्टरमध्ये बाचाबाची झाली. शाब्दिक चकमक आणि आरोप-प्रत्यारोपानंतर तरुणीने इमामवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन डॉक्टरविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी डॉ. पाटील विरुद्ध विनयभंगाचे कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टरची चौकशी केली असता त्यांनी आरोप फेटाळून लावला. घटनेच्या वेळी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होती. तरुणीला तपासताना आपल्या आजूबाजूला एका महिलेसह दोन कर्मचारी होते, असा दावा करून डॉक्टरने जुन्या एका प्रकरणामुळे आपल्याविरुद्ध खोटा आरोप लावण्यात आल्याचा प्रत्यारोप केला. प्रकरणातील गुंतागुंत वाढल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले आहे. घटनेच्या वेळी तेथे असलेल्या रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविल्यानंतर या प्रकरणात पोलीस कारवाई करणार असल्याचे ठाणेदार अनिल कातकडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)