शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राष्ट्रसंतांच्या विचारांसोबत ‘स्टायपंड’ही मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 23:20 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात अखेर यंदापासून ‘ग्रामसेवाव्रती’ हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.या अभ्यासक्रमाकडे तरुण विद्यार्थी वळावेत यासाठी विद्यार्थ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये ‘स्टायपेन्ड’ देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देतरुण विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठाचा पुढाकारराष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात यंदापासून पदविका अभ्यासक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात अखेर यंदापासून ‘ग्रामसेवाव्रती’ हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाकडे तरुण विद्यार्थी वळावेत यासाठी विद्यार्थ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये ‘स्टायपेन्ड’ देण्यात येणार आहे. यासंदर्भात बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ‘लोकमत’ने मागील दोन वर्षांपासून सातत्याने हा मुद्दा लावून धरला होता हे विशेष.राष्ट्रसंतांच्या विचारांचा समाजात व तरुण पिढीत प्रचारप्रसार व्हावा या उद्देशाने हे अध्यासन स्थापन करण्यात आले. मात्र येथे तरुण विद्यार्थ्यांची संख्या हवी तेवढी नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित ज्येष्ठ किंवा वयाने मोठे असलेल्या नागरिकांनी येथे प्रवेश घेतले आहेत. मात्र ३ ते ४ वर्षांनी या अध्यासनाला विद्यार्थी मिळतील की नाही, असा प्रश्न आहे. ही बाब लक्षात घेता येथे विशिष्ट वयापर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘स्टायपेन्ड’ सुरू करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. ‘लोकमत’ने ही अध्यासनातील विद्यार्थ्यांच्या संख्येची बाब समोर आणल्यानंतर यासंदर्भात २०१७ साली झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंथन झाले होते. मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना ‘स्टायपेन्ड’ दिला तर इतर विभागांकडूनदेखील अशी मागणी होईल. त्यामुळे येथे पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा व तेथील विद्यार्थ्यांना ‘स्टायपेन्ड’ द्यावा, अशी सूचना व्यवस्थापन परिषदेतर्फे करण्यात आली होती.पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संपूर्ण तयारी आवश्यक होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभ्यास मंडळातून अभ्यासक्रम तयार करणे अनिवार्य होते. विद्यापीठात अभ्यास मंडळे अस्तित्वात आली व त्यानंतर अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला. या प्रक्रियेला वर्षभराचा कालावधी लागला. यासंदर्भातील प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेत मांडण्यात आला व सखोल मंथनानंतर याला मंजुरी देण्यात आली.हजेरी असेल तरच मिळणार ‘स्टायपेंड’वर्षभराच्या या पदविका अभ्यासक्रमात सत्रप्रणाली नसेल, तर वार्षिक प्रणाली राहणार आहे. ३० वर्षांहून कमी वय असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये इतका ‘स्टायपेंड’ देण्यात येईल. परंतु येथे विद्यार्थ्यांना नियमित वर्ग करावे लागणार आहे. जर एखाद्या महिन्यातील हजेरी कमी असेल तर पुढील महिन्यात त्या विद्यार्थ्याला ‘स्टायपेंड’ मिळणार नाही. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी नेल्सन मंडेला वसतिगृहात १० विद्यार्थ्यांना सर्वसाधारण दरातच प्रवेश देण्यात येणार आहेत.राष्ट्रसंताच्या विचारांचा प्रचार-प्रसारहा पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बदलविणारा ठरणार आहे. येथे वर्गखोलीतील धड्यांसोबतच विद्यार्थ्यांना समाजाशीदेखील जोडले जाणार आहे. विविध सामुदायिक उपक्रम करणे अनिवार्य असेल. सोबतच विद्यार्थ्यांना २ ते ३ आठवडे समाजात राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार-प्रसारदेखील करावा लागेल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज