शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टी मिळेना, बांधकामे रखडली

By admin | Updated: November 25, 2015 07:07 IST

गिट्टीवर आकारण्यात येणारी रॉयल्टी दुप्पट केल्याच्या विरोधात क्रशर मालकांनी गेल्या १० दिवसांपासून संप

क्रशर मालकांचा संप : दर प्रति ट्रक ७ हजारावर पोहचलेनागपूर : गिट्टीवर आकारण्यात येणारी रॉयल्टी दुप्पट केल्याच्या विरोधात क्रशर मालकांनी गेल्या १० दिवसांपासून संप पुकारला आहे. खाणीतून गिट्टी बाहेर पडणे बंद झाले आहे. नेमका याचा फायदा हार्डवेअर चालक व बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सने घेण्यास सुरुवात केली आहे. साठवून ठेवलेली गिट्टी ट्रकमागे दोन हजार रुपये जास्त आकारून विकल्या जात आहे. मात्र, हा साठादेखील पुढील दोन-तीन दिवसात संपणार असून त्यानंतर बांधकामे बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.महाराष्ट्रात गिट्टीवर २०० रुपये प्रति बास रॉयल्टी आकारण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने ११ मे २०१५ रोजी गौण खनिजावरील रॉयल्टी दुप्पट केली. आता प्रती ब्रास ४०० रुपये रॉयल्टी आकारल्या जात आहे. याशिवाय महसूल विभागाने नुकतेत मुंबई येथे सचिवस्तरीय बैठक घेत खनिज विकास निधीच्या रूपात रॉयल्टीवर ३३ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. याची अंमलबजावणीही लवकरच केली जाणार आहे. या विरोधात आॅरेंज सिटी स्टोन क्रशर ओनर्स असोसिएशन, नागपूर ने १५ नोव्हेंबरपासून संप पुकारला असून खाणीतून गिट्टी काढणे बंद केले आहे. ही करवाढ क्रशर मालकांवर लादण्यात येणार असली तरी याचा परिणाम घर बांधण्यासाठी गिट्टी खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांवरच होणार आहे.क्रशरच्या संपामुळे हार्डवेअर दुकानांना होणारा गिट्टीचा पुरवठा गेल्या १० दिवसांपासून बंद झाला आहे. काही हार्डवेअर दुकानदार व बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सकडे काही प्रमाणात गिट्टीचा साठा आहे. याचा फायदा ते उचलत आहेत. पूर्वी २०० फूट गिट्टी भरलेला ट्रक ५ हजार ते ५२०० रुपयांमध्ये मिळायचा. आता त्याच गिट्टीसाठी किमान ७ हजार रुपये आकारले जात आहे. लोकमत प्रतिनिधीने याची खातरजमा करण्यासाठी काही हार्डवेअर दुकानांना भेट देऊन एक ट्रक गिट्टी खरेदी करायची असल्याचे सांगितले. यावर हार्डवेअर दुकानदारांनी क्रशर मालकांचा संप असल्याचे सांगत संप मिटेपर्यंत गिट्टी मिळणे कठीण असल्याचे सांगितले. काहींना संपामुळे मध्य प्रदेशातून गिट्टी आणावी लागत असल्याचे कारण देत त्यामुळे वाढीव दर द्यावे लागतील, असे सांगितले. तर काहींनी आपल्याकडे तीन-चार ट्रक गिट्टीचा साठा असल्याचे सांगत त्यातून गिट्टी देण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यासाठी प्रति ट्रक ७ हजार रुपये द्यावे लागले, असे स्पष्टपणे सांगितले. बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, क्रशरच्या संपामुळे गिट्टीचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे दरही वाढले आहेत. गिट्टीचा साठा संपला पूर्वी मोठे बिल्डर चार ते पाच ट्रक गिट्टीचा साठा करून ठेवायचे. मात्र, बांधकाम क्षेत्रात मंदी सुरू असल्यामुळे मोठे बिल्डरही गिट्टीत पैसे गुंतवून न ठेवता गरज भासेल तेव्हाच गिट्टी खरेदी करतात. त्यामुळे मोठ्या बिल्डरकडेही गिट्टीचा साठा उपलब्ध नाही. ज्यांच्याकडे साठा होता तोही आता संपला आहे. क्रशर मालकांचा संप पुढे काही दिवस सुरू राहिला तर शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेली सर्वच लहान, मोठी बांधकामे बंद पडतील. बहुतांश बिल्डर्सने कर्ज घेतले आहे. बांधकामे काही दिवस बंद राहिली तर बिल्डर्सवर व्याजाचा भुर्दंड बसेल. शिवाय बांधकाम मजुरांचीही उपासमार होण्याचा धोका आहे. - सुंदर रतन, अध्यक्ष, नागपूर ग्रामीण बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स असोसिएशन