शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

लिटीलनंतर जेंटिलची गुंडागर्दी

By admin | Updated: May 3, 2015 02:15 IST

पाटणकर चौकातील गोळीबाराचा आरोपी लिटील सरदारचा भाऊ जेंटिल सरदारने आपल्या साथीदारासोबत बुद्धनगर येथील एका घरावर हल्ला केला.

नागपूर : पाटणकर चौकातील गोळीबाराचा आरोपी लिटील सरदारचा भाऊ जेंटिल सरदारने आपल्या साथीदारासोबत बुद्धनगर येथील एका घरावर हल्ला केला. यात एक तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. सौरभ मनोज बावनगडे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या उपचार सुरू आहेत. जेंटिल सरदार (बुद्धनगर), इत्ते खान (टेकानाका), प्रणय पाटील, पंकज आणि टुंबा अशी आरोपीची नावे आहेत. परिसरातील नागरिक जेंटिलच्या गुंडागर्दीमुळे दहशतीत आहेत. सूत्रानुसार बावनगडे कुटुंबातर्फे मागील दोन वर्षांपासून संदलचे आयोजन करीत आहे. ३० एप्रिल रोजी बावनगडे कुटुंबाने घराच्या समोर कार्यक्रमासाठी मंडप टाकला. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांना थोड्या दूर अंतरावर काही लोक एका झाडाखाली जुगार खेळतांना दिसले. सौरभ बावनगडे हा आपल्या मित्रांसोबत झाडाजवळ गेला. त्याला जेंटिल, प्रणय, इत्ते आणि टुंबा जुगार खेळतांना दिसले. त्याने धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याने येथे जुगार खेळण्या मनाई केली. त्यामुळे जेंटिलला राग आला त्याने त्याला शिवीगाळ करीत खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सौरभ गुपचूप निघून गेला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सौरभ, त्याचा भाऊ अंशुल, अनिकेत सहारे, सत्यम आदी घरासमोर संदलवाल्यांना शिल्लक रक्कम देण्यासाठी उभे होते. दरम्यान रात्री १२ वाजताच्या सुमारास जेंटिल आणि इतर आरोपी तलवार, चाकू आणि दंडे घेऊन आले. त्यांनी सौरभला धमकावत मारहाण केली. चाकूने सौरभच्या हातावर वार केले. सौरभला वाचवण्यासाठी धावलेल्या आईला व भावालाही वीट फेकून मारली. पाचपावली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)