शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानानंतरही जगू शकतो सामान्य जीवन

By admin | Updated: August 13, 2016 02:30 IST

किडनी, यकृत किंवा इतर अवयव दानानंतर माणूस सामान्य जीवन जगू शकत नाही अशी भीती किंवा संभ्रम लोकांमध्ये असते.

ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर जुही पवारचा विश्वास : युवकांना पुढे येण्याचे आवाहन नागपूर : किडनी, यकृत किंवा इतर अवयव दानानंतर माणूस सामान्य जीवन जगू शकत नाही अशी भीती किंवा संभ्रम लोकांमध्ये असते. मात्र ही भीती पूर्णपणे चुकीची आहे. अवयवदान करणारी व्यक्ती वजन उचलण्यापासून जलतरण करण्यापर्यंत कोणतेही कार्य अगदी सहज आणि सामान्य लोकांप्रमाणे करू शकते हा विश्वास वडिलांना आपले यकृत दान करणारी आणि आता अवयवदानाची राज्य शासनाची ब्रँड अ‍ॅम्बेसडर जुही पवार हिने दिला. मूळची जळगावची जुही सध्या मुंबईच्या सोमय्या वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेतही सहभाग घेतला आहे. मात्र तिची ओळख तिने केलेल्या अद्वितीय कार्यामुळे आहे. वडिलांचा यकृताचा आजार बळावला तेव्हा ती अवघ्या १९ वर्षाची होती व वैद्यकीय महाविद्यालयात नुकताच प्रवेश केला होता. मात्र वडिलांचा त्रास पाहून तिने मोठा निर्णय घेतला. स्वत:च्या यकृताचा भाग वडिलांना देण्याचा. वडिलांसह अनेकांनी तसे करण्यास तिला मनाई केली. मात्र डॉक्टरांशी चर्चा करून तिने यकृताचा ७० टक्के भाग वडिलांना दिला. तिच्या साहसाची दखल घेत सरकारने मागील वर्षी अवयव दानाची अग्रदूत म्हणून निवड केली. अवयदानाच्या जनजागृतजीसाठी आयोजित एका कार्यक्रमासाठी नागपूरला आलेल्या जुहीने ‘लोकमत’शी बोलताना अवयव दानाबाबत आपले मत व्यक्त केले. भारतात दोन लाख किडनी आणि जवळपास एक लाख यकृताची आवश्यकता आहे. मात्र अवयवदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. क्रोएशिया, स्पेनसारख्या देशांमध्ये अवयव दान करणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. देशात १० लाखांमधून एक व्यक्ती जरी अवयवदानासाठी पुढे आली तर सर्वांची गरज पूर्ण होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. तामिळनाडू आणि इतर दक्षिणात्य राज्यात अवयदानाबाबत आनंददायक वातावरण असल्याचे तिन सांगितले.(प्रतिनिधी) अवयवदानावर जनजागृती रॅली आज डॉ. रवी वानखेडे म्हणाले, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त झोनल ट्रान्सप्लॅन्ट कोआॅर्डिनेशन सेंटर, मोहन फाऊंडेशन नागपूर केंद्र व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे १३ आॅगस्ट रोजी अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुही पवार या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. सकाळी ९.३० वाजता बजाजनगर येथील मातृ सेवा संघाच्या प्रांगणातून अवयवदान जनजागृती पदयात्रा रॅलीला सुरुवात करण्यात येईल. महापौर प्रवीण दटके हिरवी झेंडी दाखवतील. एलएडी महाविद्यालयात रॅलीचे समापन होईल. पत्रपरिषदेला निवृत्त एसीपी चंद्रकांत उद््गीकर, चारुलता बावनकुळे, डॉ. डी.जी. वाघमारे, मातृ सेवा संघाचे डॉ. जॉन मेनॉचरी, विद्यापीठाचे एनएसएसचे समन्यवयक डॉ. भाऊ दायदार प्रामुख्याने उपस्थित होते.