शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गायनाचार्य उषा पारखी सहस्रचंद्रदर्शन सोहळा

By admin | Updated: August 14, 2014 01:19 IST

विदर्भातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शास्त्रीय गायिका गुरू गायनाचार्य डॉ. उषाताई पारखी यांनी नुकतीच वयाची ८० वर्षे पूर्ण केली. यानिमित्त त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शास्त्रीय गायिका गुरू गायनाचार्य डॉ. उषाताई पारखी यांनी नुकतीच वयाची ८० वर्षे पूर्ण केली. यानिमित्त त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही पारंपरिक भजनांच्या सीडीचे लोकार्पणही क रण्यात आले. हा कार्यक्रम राणी लक्ष्मीबाई सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गिरीश गांधी, डॉ. रा. कृ. उपाख्य बाळासाहेब पारखी, स्पीक मॅकेच्या अध्यक्षा डॉ. निशाताई कुळकर्णी, डॉ. उषा पारखी उपस्थित होत्या. डॉ. निशा कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी डॉ. उषा पारखी यांच्या दीर्घ व यशस्वी गायन तसेच कौटुंबिक जीवनाचा परिचय करून दिला. गिरीश गांधी यांनी त्यांचा आत्मीय सत्कार करून आपल्या अभिनंदनपर शुभेच्छा व्यक्त केल्या. उषातार्इंनी मनोगतात या आयोजनाबाबत कृतज्ञता आणि मनस्वी आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आचार्य विवेक गोखले, पं. चंद्रहास जोशी यांनीही उषातार्इंच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकून त्यांचे अभिनंदन केले. उषातार्इंचे चिरंजीव राजीव पारखी यांनी प्रारंभी शारदावंदना व गुरूवंदना सादर केली. यावेळी ज्येष्ठ संगीततज्ज्ञ डॉ. बाळासाहेब पुरोहित, पं. मुरलीधर दीक्षित, अण्णाजी गिल्लरकर, डॉ. कल्याणी देशमुख, म. ना. लोही व संगीतप्रेमी रसिक तसेच पुणे येथील अभियंता पदावर कार्यरत असलेले उषातार्इंचे शिष्य व सीडी तील भजनांचे गायक सुदर्शन नासेरी प्रामुख्याने उपस्थित होते.मीनल, राजीव, अंजली, नितीन, सीमा, अभीन पारखी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)