मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलननागपूर : शौर्यपदकप्राप्त सेवारत सैनिक, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांना गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव पुरस्कार व धनादेश प्रदान करण्यात आलेत. कार्यक्रम रामगिरी येथे पार पडला.पुरस्कारर्थींमध्ये मुंबई येथील ब्रिगेडिअर प्रदीप नायर (सेवारत), अहमदनगर येथील राहिनी मेहत्रे (वीरपत्नी), आजीनाथ मेहत्रे (वीरपिता), लीला मेहत्रे (वीरमाता), कोल्हापूर येथील सुगंधा भिकले (वीरपत्नी), लीला भिकले (वीरमाता), बाळू भिकले (वीरपिता), सुवर्णा कनकनवाडी (वीरपत्नी), कश्यव्वा कनकनवाडी (वीरमाता), इराप्पा कनकनवाडी (वीरपिता), गोंदिया येथील शिपाई बाळकृष्ण बरये (सेवारत) यांचा समावेश आहे. याप्रसंगी सशस्त्र सेना ध्वजदिन-२०१४ निधी संकलन कार्यक्रमाचे उद्घाटन आणि गेल्यावर्षी उत्कृष्ट निधी संकलन केल्यामुळे विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट नितीन पांडे यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, माजी सैनिकांच्या पाल्यांच्या कल्याणाकरिता २ लाख रुपये देणाऱ्या प्रतिभा पेंढारकर, १ लाख रुपये देणारे डॉ. अनिल चहांदे, दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान देण्यासाठी मुलाचे अवयव दान करणारे माजी सैनिक संजयकुमार सिंह व ध्वजदिन निधीकरिता ३५ हजार रुपये देणारे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात संचालक कर्नल सुहास जतकर, उपसंचालक कर्नल रतनसिंह नायकवडे आदी उपस्थित होते.
शौर्यपदकप्राप्त सैनिकांना गौरव पुरस्कार
By admin | Updated: December 12, 2014 00:30 IST