शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणपती आले हो घरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:10 IST

- वाजत-गाजत विघ्नहर्त्याचे झाले आगमन : भक्तांसोबतच पाऊसही होता सज्ज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्षभरापासून ज्या क्षणाची प्रतीक्षा ...

- वाजत-गाजत विघ्नहर्त्याचे झाले आगमन : भक्तांसोबतच पाऊसही होता सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षभरापासून ज्या क्षणाची प्रतीक्षा भक्तांमध्ये असते, तो क्षण शुक्रवारी आला. श्रीगणेश चतुर्थीला शुक्रवारी श्री गणपतीचे आगमन घरोघरी झाले आणि श्रीगणेशोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी भक्तांमध्ये दिसून येत असलेला उत्साह अवर्णनीय असाच होता. कोरोनाचे सगळे प्रोटोकॉल जपत आपल्या लाडक्या देवतेच्या आगमनाची प्रतीक्षा शुक्रवारी संपली आणि पुढचे दहा दिवस भक्त बाप्पाची आवभगत करण्यास सज्ज झाले.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदा कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध तेवढे कठोर नसले तरी प्रशासनाने सजगता म्हणून भक्तांना आपला जल्लोष आवरता घेण्याचे आवाहन केले. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी मूर्तिकारांकडून श्रीगणेशाची मूर्ती आपल्या स्थळी नेताना भक्तांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले होते. जल्लोषाला आवर घातला तरी भावना उचंबळणार नाही तो बाप्पाचा भक्त कसला म्हणून, मध्येच ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणा दिल्या जात होत्या आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचा उत्साह द्विगुणित केल्या जात होत्या.

- मूर्तिकारांकडून बाप्पाला घेऊन जाताना यंदा मिरवणुकीचा लवाजमा नव्हता.

- दरवर्षीप्रमाणे ढोल-ताशा पथकांचा गजर झाला नाही.

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाला घरी नेण्यासाठी येणाऱ्या मंडळींमध्ये लहान मुलांचा समावेश दिसत नव्हता.

- गर्दी टाळावी म्हणून भक्त समुहाने येण्याऐवजी दोन किंवा चारच जण बाप्पाला नेण्यासाठी आलेले दिसत होते.

- उत्सवावर निर्बंध असल्याने मंडळांमध्ये सजावटीचे साहित्य घेण्याची उत्सुकता दिसत नव्हती.

- घरगुती गणपतीच्या सजावटीवरही मर्यादा आल्याचे बाजारातील कमी झालेल्या गर्दीवरून दिसत होते.

- नागरिकच कोरोनाचे नियम पाळत असल्याचे दिसत असल्याने पोलिसांची दमछाक होताना दिसली नाही.

.......................