शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर रणजित सफेलकरचा राजमहाल होणार भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनेकांची हत्या करून, कित्येकांची मालमत्ता हडप करणारा आणि गुन्हेगारीच्या माध्यमातून कोट्यवधीची मालमत्ता जमविणारा कुख्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनेकांची हत्या करून, कित्येकांची मालमत्ता हडप करणारा आणि गुन्हेगारीच्या माध्यमातून कोट्यवधीची मालमत्ता जमविणारा कुख्यात गुंड रणजित सफेलकर याचा नागपूर-कामठी मार्गावरचा राजमहल नावाचा बंगला आज, बुधवारी पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून भुईसपाट केला जाणार आहे. सफेलकर सध्या पोलीस कोठडीत आहे.

पाच कोटी रुपयांची सुपारी घेऊन त्याने आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची हत्या करवून घेतली होती. त्याचप्रमाणे सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी मनीष श्रीवास यांचीही हत्या केली होती. संपर्कातील विशाल पैसाडेली याला वाहनाने चिरडून त्याची हत्या केल्यानंतर तो अपघात असल्याचा बनाव केला होता. याशिवाय सफेलकरने कुणाचे दुकान, कुणाची जमीन, तर कुणाचा भूखंड हडपून कोट्यवधीची मालमत्ता जमविलेली आहे. त्याने अनेकांना जिवे मारण्याच्या धमक्या देऊन खंडणी वसुलीही केली आहे. त्याच्या पापाचा घडा फोडून गुन्हे शाखेने त्याला आणि त्याच्या साथीदारांना महिनाभरापूर्वी अटक केली. चौकशीत सफेलकर आणि त्याच्या टोळीने केलेल्या डझनावर गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून पोलिसांनी त्याच्या अवैध संपत्तीची कागदपत्रे जप्त केली. त्याने कामठी नागपूर मार्गावर राजमहल नावाने बंगला बांधला. तो काळ्या पैशातून आणि पापाच्या कमाईतून बांधल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी तसा अहवाल प्रशासनाकडे सादर केला होता. हा बंगला भुईसपाट करण्याची परवानगी मागितली होती. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक महापालिका प्रशासनाच्या मदतीने सफेलकरचा राजमहल आज, बुधवारी सकाळी उद‌्ध्वस्त करणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त लावला जाणार आहे.

---

यापूर्वीही झाली कारवाई

गेल्या वर्षी गुन्हे शाखा पोलिसांनी गँगस्टर संतोष आंबेकर आणि खंडणीबाज साहिल सय्यद यांचेही बंगले अशाच प्रकारे जमीनदोस्त केले होते.

---