शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:09 IST

नागपूर : अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मानकापूर पोलिसांनी विद्यार्थिनीच्या नातेवाइकासह तीन ...

नागपूर : अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मानकापूर पोलिसांनी विद्यार्थिनीच्या नातेवाइकासह तीन आरोपींना अटक केली आहे.

मंगेश नामदेव हुडके (३२), नीलेश ब्रिजलाल सिंह ठाकूर (४५) आणि आकाश राजेश खोटे (२९), अशी आरोपींची नावे आहेत. पीडित १७ वर्षांच्या विद्यार्थिनीचा मंगेश हुडके नातेवाईक आहे. मंगेशची ठाकूर सोबत मैत्री आहे, तर आकाश ठाकूरकडे किरायाने राहतो. यामुळे विद्यार्थिनी तिघांनाही ओळखते. ११ मार्च २०२० रोजी विद्यार्थिनी कोचिंग क्लासवरून येत असताना रस्त्यात ठाकूरने तिला आंघोळ करीत असलेल्या मुलीचा व्हिडिओ दाखवून मुलगी कोण आहे, हे ओळखण्यास सांगितले. व्हिडिओतील मुलीची शरीरयष्टी स्वत:सारखी असल्यामुळे विद्यार्थिनी घाबरून तेथून निघून गेली. त्यानंतर १३ मार्चला ठाकूरने विद्यार्थिनीला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन सोबत चलण्यास सांगितले. भीतीपोटी विद्यार्थिनी ठाकूरच्या कारमध्ये बसली. ठाकूरने तिच्या डोळ्यावर पट्टी आणि हातही बांधले. तिला जबरदस्ती दारू पाजली आणि एका घरात नेले. तेथे मंगेश आणि आकाश उपस्थित होते. ठाकूर आणि मंगेशने विद्यार्थिनीवर बलात्कार केला. त्यानंतर मंगेश आणि ठाकूर व्हिडिओ डिलीट करण्यासाठी तिला तीन ते चार लाख रुपये मागू लागले. विद्यार्थिनीने त्यांना २५ ते ३० हजार रुपये दिले. ठाकूरने तिच्या मोबाइलमधून तिच्या बहिणीचा फोटो घेतला होता. विद्यार्थिनीने संधी साधून त्याच्या मोबाइलमधून फोटो डिलीट केला. ४ मार्च २०२१ रोजी ठाकूर आणि मंगेश नेहमीच्या ठिकाणी विद्यार्थिनीला घेऊन गेले. फोटो डिलीट का केला म्हणून तिला मारहाण करू लागले. सिगारेटने चटके देण्याची धमकी देऊन त्यांनी दारू पाजून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. मंगेशने तिला घरातील ५० हजार रुपये आणण्यास सांगितले. तेथून वाकी येथील एका फार्महाउसवर नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. कुटुंबीयांचा खून, बहिणीवर बलात्काराची धमकी दिल्यामुळे तिने कोणालाच काही सांगितले नाही; परंतु कुटुंबीयांनी तिलाच चुकीचे समजून आजी-आजोबांकडे मध्यप्रदेशात पाठविले. २२ ऑगस्टला रक्षाबंधनासाठी तिचे आई-वडील मुलीला भेटण्यासाठी मध्यप्रदेशात गेले. तेथे तिने आई-वडिलांना आपबीती सांगितली. त्यानंतर नागपुरात आल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी सामाजिक कार्यकर्ते सुनीता ठाकुर, संगीता उमाठे, मनीषा रामटेके, हफीज साबरी यांच्या मदतीने मानकापूर ठाण्यात आरोपींविरुद्ध बलात्कार, पोक्सो, मारहाण, लुटमारीचा गुन्हा दाखल केला. मानकापूर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

..........