लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी वसतिगृहातील माजी विद्यार्थ्याने रद्दी पेपरच्या माध्यमातून गणेशाची प्रतिमा तयार करून इको फ्रेण्डली गणपती साकारला आहे. हा गणपती आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात स्थापन करण्यात आला.अंबाझरी हिल येथे सामाजिक न्याय विभागाचे मान्यताप्राप्त विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहे. या वसतिगृहाचे माजी विद्यार्थी विक्की अंबादरे हे दरवर्षी गणपती प्रतिमा तयार करण्याची कार्यशाळा वसतिगृहात घेत असतात. निसर्ग रक्षण व पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा या हेतूने यंदाही वसतिगृहात गणपती मेकिंग कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत रद्दीच्या पेपरमधून गणेशमूर्ती साकारण्यात आली असून हीच मूर्ती वसतिगृहात स्थापन करण्यात आली. यावेळी वसतिगृहाचे सचिव दिनेश शेराम, शुभांगी शेराम, गणेश करणाहके आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Ganesh Chaturthi 2018; नागपुरातील आदिवासी वसतिगृहात रद्दी पेपरमधून साकारली गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 10:07 IST
आदिवासी वसतिगृहातील माजी विद्यार्थ्याने रद्दी पेपरच्या माध्यमातून गणेशाची प्रतिमा तयार करून इको फ्रेण्डली गणपती साकारला आहे.
Ganesh Chaturthi 2018; नागपुरातील आदिवासी वसतिगृहात रद्दी पेपरमधून साकारली गणेशमूर्ती
ठळक मुद्देकार्यशाळेत रद्दीच्या पेपरमधून गणेशमूर्ती साकारण्यात आली