शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील फरार आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : खून केल्यानंतर पसार झालेल्या आराेपीला अटक करण्यात कामठी (नवीन) पाेलिसांना तीन वर्षांनंतर यश आले. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : खून केल्यानंतर पसार झालेल्या आराेपीला अटक करण्यात कामठी (नवीन) पाेलिसांना तीन वर्षांनंतर यश आले. त्याला नागपूर शहरातील माेठा ताजबाग परिसरातून गुरुवारी (दि. २७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली.

शेख खुर्शिद शेख हुसेन (वय ५०, रा. रामगड, कामठी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रामगड भागात २०१८ साली इक्बाल जमील शेख याचा खून करण्यात आला. या खुनात शेख खुर्शिद शेख हुसेन याचा सहभाग हाेता. खून केल्यानंतर ताे कामठी शहरातून पळून गेला हाेता. तेव्हापासून आजवर कामठी (नवीन) पाेलीस त्याच्या मागावर हाेते. मात्र, ताे पाेलिसांना सतत हुलकावणी देत हाेता.

ताे गुरुवारी रात्री नागपूर शहरातील माेठा ताजबाग परिसरात नाव बदलून वावरत असल्याची माहिती कामठी (नवीन) पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या विशेष पथकाने त्या भागात सापळा रचला व त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी त्याच्याविराेधात भादंवि ३०२, १२० (ब), ३२४, ३०७, ४२७, १४४, १४७, १४९ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, संदीप सगने, राजेंद्र टाकळीकर, सुरेंद्र शेंडे, कमल कनोजिया यांच्या पथकाने केली.

===Photopath===

280521\img-20210527-wa0194.jpg

===Caption===

खुणातील फरार आरोपीस अटकेची कामगिरी बजावणारे नवीन कामठी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक