शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीवरून बार कौन्सिल व हायकोर्ट बार आमोरासामोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST

राकेश घानोडे नागपूर : कोरोना संक्रमणामुळे वकिलांची कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याकरिता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाने ...

राकेश घानोडे

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे वकिलांची कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याकरिता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाने महाराष्ट्र व गोवामधील मान्यताप्राप्त वकील संघटनांच्या प्रस्तावित निवडणुका येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या निवडणुकीसाठी २३ जुलै ही सुधारित तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे बार कौन्सिल व हायकोर्ट बारमध्ये वादाची ठिणगी पडली असून या मुद्यावरून ते समोरासामोर आले आहेत.

महाराष्ट्र व गोवातील विविध वकील संघटनांनी निवडणुका पुढे ढकलण्यासाठी बार कौन्सिलला निवेदने सादर केली होती. त्यामुळे गेल्या महिन्यात बार कौन्सिलच्या कार्यकारी मंडळाची ऑनलाइन बैठक झाली. त्यात वकील संघटनांची निवेदने, वर्तमान कोरोना संक्रमण, सरकारद्वारे लागू विविध निर्बंध, कोरोना संक्रमणाची संभाव्य तिसरी लाट, वकिलांच्या आरोग्याचे रक्षण इत्यादी बाबी लक्षात घेता दोन्ही राज्यांमधील मान्यताप्राप्त वकील संघटनांच्या प्रस्तावित निवडणुका येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या निवडणूक समितीने निवडणुकीची सुधारित तारीख जाहीर करताना या निर्णयाकडे दुर्लक्ष केले. कोरोना संक्रमणामुळे ही निवडणूक गेल्यावर्षीपासून पाच-सहा वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी बार कौन्सिलने वकील संघटनांच्या निवडणुकीसंदर्भात अशा प्रकारचा निर्णय घेतला नव्हता. सध्या बार कौन्सिलचा सदर निर्णय अस्तित्वात आहे. या परिस्थितीत हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या निवडणूक समितीने या निर्णयाशी सुसंगत होईल, अशी निवडणुकीची पुढील तारीख जाहीर करायला हवी होती; परंतु या निवडणूक समितीचे बार कौन्सिलच्या निर्णयाकडे दुर्लक्ष झाल्याचे निवडणुकीच्या सुधारित तारखेवरून स्पष्ट होत आहे. बार कौन्सिलने ही कृती गंभीरतेने घेतली आहे. माघार न घेतल्यास हायकोर्ट बार असोसिएशनवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

--------------------

कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल

हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या निर्णयाचे उल्लंघन केले आहे. यासंदर्भात बार कौन्सिलची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करून हायकोर्ट बार असोसिएशनला अधिवक्ता कायद्यातील कलम ३५ अंतर्गत, शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले जाईल, असे बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. अनिल गोवारदीपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

-------------

निवडणुकीची तारीख अंतिम नाही

हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या निवडणूक समितीचे सदस्य ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी निवडणुकीची सुधारित तारीख अंतिम नसल्याचे सांगितले. उच्च न्यायालयात नियमित कामकाज सुरू झाले, तरच २३ जुलै रोजी निवडणूक घेतली जाईल. त्यावेळी बार कौन्सिलकडे निवडणूक घेण्याची परवानगी मागितली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी सुधारित तारीख निश्चित झाल्यानंतर जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये बार कौन्सिलचा संबंधित निर्णय लक्षात घेता कौन्सिलची परवानगी मिळाल्यानंतरच निवडणूक घेतली जाईल, असे कुठेच स्पष्ट करण्यात आले नाही, हे उल्लेखनीय.