शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

ताजा भाजीपाला मिळेल दारी

By admin | Updated: May 30, 2014 01:13 IST

शेतकर्‍यांच्या माळ्य़ावरील ताजी भाजी थेट ग्राहकांच्या दारी मिळावी, शिवाय यातून शेतकर्‍यांना लाभ व्हावा, यासाठी कृषी व पणन विभागाने एक अभिनव प्रयोग हाती घेतला आहे.

कृषी विभागाचे फिरते विक्री केंद्र : मुंबई, पुण्यानंतर नागपुरात प्रयोग जीवन रामावत  - नागपूर शेतकर्‍यांच्या माळ्य़ावरील ताजी भाजी थेट ग्राहकांच्या दारी मिळावी, शिवाय यातून शेतकर्‍यांना  लाभ व्हावा, यासाठी कृषी व पणन विभागाने एक अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. नागपूरच्या सभोवताल मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पिकतो. परंतु तो दलालांच्या माध्यमातून  ग्राहकांपर्यंंंत पोहोचतो. त्यामुळे शेतकर्‍यांना योग्य भाव मिळत नाही. शिवाय ग्राहकांचीही लूट होते.  अशा स्थितीत शेतकर्‍यांनी स्वत:चा भाजीपाला स्वत:च ग्राहकांपर्यंंत पोहोचवावा, हा यामागील  मुख्य उद्देश आहे. यासाठी कृषी व पणन विभाग १३ सुसज्जित व्हॅन तयार करीत असून, त्यापैकी  पहिली व्हॅन नागपुरात दाखल झाली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत ती शेतकर्‍यांच्या ताज्या  भाजीपाल्यासह ग्राहकांच्या दारावर उभी दिसणार आहे. विशेष म्हणजे, ही व्हॅन खास पद्घतीने तयार  केली असून, ती सर्वांंंच्या आकर्षणाचे कें द्र बनली आहे. सोबतच कृषी विभागाने नागपूर विभागात  सुमारे ४६८ शेतकरी गट तयार करून, त्यांच्या चार कंपन्या स्थापन केल्या जात आहे. या  कंपन्यांच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीचा संपूर्ण व्यवहार चालणार आहे.  विशेष म्हणजे, कृषी  व पणन विभागाने यापूर्वी ही योजना मुंबई व पुणे येथे राबविली आहे. तेथील ग्राहकांचा मिळालेला  प्रतिसाद लक्षात घेता आता ती नागपुरात राबविली जात आहे. यात फिरते विक्री केंद्रे व ठिकठिकाणी २८२ किरकोळ भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले जाणार  आहेत. यात शेतकरी गट, बचत गट व बेरोजगार तरुणांना अनुदानावर फिरते विक्री केंद्र व दुकाने  दिले जाणार आहेत.शहरात २८२ विक्री केंद्रे नागपूर : या योजनेंतर्गत शहरात २८२ सुसज्जित भाजीपाला विक्री केंद्रे तयार केली जाणार आहेत.  यात ज्यांच्याकडे अगोदरच दुकाने उपलब्ध आहेत, त्यांना ते दुकान अधिक सुसज्ज करण्यासाठी  शासनाकडून १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. तसेच व्हॅन खरेदीसाठी दोन लाख रुपयांचे  अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा शेतकरी गट, बचत गट व सुशिक्षित बेरोजगार अशा कुणालाही लाभ  घेता येणार आहे. केवळ शासकीय अनुदानाचा लाभ घेणार्‍यांनी शेतकर्‍यांचाच भाजीपाला खरेदी  करून तो विक्री करावा, अशी अट घालण्यात आली आहे. तरी यासाठी इच्छुकांनी विभागीय कृषी  सहसंचालक कार्यालय, पणन विभाग किंवा आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा,  असे विभागीय कृषी अधीक्षक आर. बी. चलवदे यांनी आवाहन केले आहे. वर्षभरात १ कोटी १५ लाखांचा खर्च कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार गतवर्षी या भाजीपाला पुरवठा प्रकल्पासाठी नागपूर जिल्ह्याला  एकूण १ कोटी १६ लाख २५ हजार रुपयांचे शासकीय अनुदान प्राप्त झाले असून, त्यापैकी १  कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यातून भाजीपाला  लागवडीवर ७५ लाख ३७ हजार, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापनावर ६२ हजार, शेडनेट  व हरितगृहांवर १९ लाख ९७ हजार, मनुष्यबळ विकास कार्यक्रमांवर एक लाख ६८ हजार, पॅक  हाऊस व शितगृह बांधणीवर १७ लाख २२ हजार, प्रतवारी व विक्री केंद्र उभारणीवर २९ हजार  आणि प्रकल्प व्यवस्थापन व संनियंत्रणावर २७ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.   (प्रतिनिधी)