शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:09 IST

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर ! - अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य : पुनर्वापर झालेले ...

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर ! - अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य : पुनर्वापर झालेले तेल बाझो-डिझेलनिर्मिती कंपनीला द्यावे नागपूर : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तेलाचे महत्त्व खूप जास्त आहे. तेलामुळे जेवण स्वादिष्ट आणि चवदार बनते. आपल्याकडे अनेक घरांत तळणीसाठी वापरलेले तेल उरल्यानंतर ते अनेकदा फोडणी किंवा इतर कोणत्याही प्रकारे वापरात आणले जाते. पण, एकदा वापरून झाल्यावर उरलेल्या तेलाचा असा पुनर्वापर करणे आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते. वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. असे असताना हॉटेलमध्ये या तेलाचा सर्रास वापर केला जातो. यामुळे असे पदार्थ खाणा-यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. या तेलामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. तेलाचा पुनर्वापर न करता बाझो-डिझेलची निर्मिती करणा-या कंपनीला विकावे, असा नियम असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले. हॉटेलपेक्षा हातठेल्यावर खाद्यपदार्थ स्वस्त असल्यामुळे अनेकजण उघड्यावर समोसे, कचोरी आणि इतर पदार्थ आवडीने खातात. या ठिकाणी तेलाचा अनेकदा पुनर्वापर केला जातो. तेलाचा पुनर्वापर अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य आहे. नियमानुसार करता येत नाही, पण त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे त्यांचे फावते. तेलाचा रंग काळा पडेपर्यंत त्याचा वारंवार वापर केला जातो. अशा तेलातून तळलेल्या पदार्थांमुळे अनेकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर ॲसिडिटी तसेच हृदयासंबंधित आजार, अल्झायमर, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एकदा वापरून झालेले तेल पुन:पुन्हा वापरल्याने ॲथेरोस्कॉलरोसिस होऊ शकतो. तेलाच्या पुनर्वापरामुळे तयार होणा-या फ्री रॅडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. याशिवाय बॅड कोलेस्ट्रॉल तयार होऊन हृदयघातही होऊ शकतो. स्मोकिंग पॉइंट कमी असलेल्या तेलाचा वापर तळणासाठी करावा. रस्त्यावर न खाल्लेलेच बरे. फुटपाथवरील हातठेल्यावर खाद्यतेलाचा पुनर्वापर करून अन्नपदार्थ तळले जातात. या पदार्थांची किंमत हॉटेलपेक्षा कमी असल्याने लोकांची गर्दी असते. अनेकजण पदार्थ खरेदी करून घरी नेतात आणि लहान मुलांना देतात. त्यामुळे शारीरिक व्याधीचा धोका जास्तच वाढतो. हे पदार्थ आजाराला आमंत्रण देतात. या ठिकाणी तेलाचा पुनर्वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे शक्यतो हातठेल्यावर तळलेले पदार्थ लोकांनी टाळायला हवे. ... तर होईल गुन्हा दाखल तेलाचा पुनर्वापर करणे हा गुन्हा ठरतो. अन्न प्रशासन विभागाकडे नोंदणी हॉटेल व रेस्टॉरंटने तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तेलाचा पुनर्वापर करू नये. अधिका-यांना आढळून आल्यास कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील. जयंत वाणे, सहआयुक्त (प्रभारी) (अन्न), अन्न व औषधी प्रशासन विभाग, तेलाचा पुनर्वापर आजाराला आमंत्रण हॉटेल आणि घरी तळलेल्या तेलाचा पुनर्वापर करू नये. तेलाचा पुनर्वापर गंभीर आजाराला आमंत्रण देणारे ठरते. या तेलामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते. धमन्या ब्लॉक होतात. त्यामुळे हृदयघात होऊ शकतो. शिवाय, अशा तेलात फ्री रेडिकल्स तयार होतात. हे रेडिकल्स आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अनेकदा या रेडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. डॉ. प्रसाद वर्दळकर. विभागाच्या १७ कारवाया तेलाचा पुनर्वापर करणाºया १७ जणांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने आतापर्यंत कारवाई केली आहे. या संदर्भात हॉटेल, रेस्टॉरंट आणि हातठेल्यावर खाद्यपदार्थ विकणा-यांवर नियमित कारवाई केली जाते. अनेकांकडून दंड तर काहींवर गुन्हे दाखल केले आहेत. पुढेही कारवाई करणार असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.