शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अनधिकृत ले-आऊटवर फ्लॅट स्कीमचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 18, 2014 02:45 IST

पूर्वी अनधिकृत असलेल्या आणि नंतर गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्यात आलेल्या नागपूर महापालिका क्षेत्रातील ले-आऊटमध्ये असलेले भूखंड एकत्रित करून ...

यदु जोशी नागपूरपूर्वी अनधिकृत असलेल्या आणि नंतर गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्यात आलेल्या नागपूर महापालिका क्षेत्रातील ले-आऊटमध्ये असलेले भूखंड एकत्रित करून त्यावर बांधकाम करण्यास परवानगी देणारा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. त्यामुळे आता या ले-आऊटमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लॅट स्कीम उभ्या राहून घरांचा प्रश्न सुटू शकेल.गुंठेवारी कायद्यानुसार अनधिकृत ले-आऊट नियमित करताना लहान लहान भूखंड एकत्र करून त्यावर बांधकाम करण्याची परवानगी दिली जात नव्हती. समजा एका व्यक्तीचे पाच-पाच हजार चौरस फुटाचे तीन भूखंड असतील तर ते एकत्र करून १५ हजार चौरस फुटावर बांधकाम करण्याची अनुमती नव्हती. आता ती काही अटींवर देण्यात आली आहे. अन्य ठिकाणी मिळालेले हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) या ले-आऊटमध्ये वापरण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी होती. ती मात्र मुख्यमंत्र्यांनी मान्य केली नाही. त्यामुळे अन्य ठिकाणी मिळालेला टीडीआर या ले-आऊटमध्ये वापरून स्वत:चा फायदा करून घेण्याच्या बिल्डर लॉबीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. टीडीआरचा वापर या ले-आऊटमध्ये वापरू नये, असे मत उच्च न्यायालयाने स्पष्टपणे व्यक्त केले होते. राज्य शासनाने त्याच्याशी सहमती दर्शविली असल्याचे फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेवरून स्पष्ट होते. पूर्वी अनधिकृत असलेल्या आणि गुंठेवारी कायद्यानुसार नियमितीकरण शुल्क भरून नियमित झालेल्या ले-आऊटमधील भूखंड एकत्रित करून त्यांचा विकास करण्यास अनुमती दिल्याने या भागात आता उंच इमारती उभ्या राहतील. त्याच्या बरोबरीने नागरी सुविधा वाढविल्या नाहीत तर सध्याची व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. नागपूरबाबत मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तोच अनधिकृत बांधकामांचा गंभीर प्रश्नाचा सामना करीत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासंदर्भात घेतला जाईल का, याबाबत उत्सुकता आहे.^