शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मोफत सायकली ‘पंक्चर’

By admin | Updated: September 9, 2016 03:16 IST

ग्रामीण भागातील गोरगरीब - सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सोयीचे व्हावे म्हणून शासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना राबविली जाते.

योजनेचा बट्ट्याबोळ : पंचायत समितीमध्ये सायकली धूळखातअभय लांजेवार  उमरेडग्रामीण भागातील गोरगरीब - सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सोयीचे व्हावे म्हणून शासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजना राबविली जाते. समाज कल्याण, महिला व बालकल्याण आणि पंचायत समितीच्या (जिल्हा परिषद) शिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचे सध्यातरी बारा वाजल्याची वास्तविकता आहे. यंदा शाळांची पहिली घंटा २६ जूनला वाजली. शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप विद्यार्थ्यांना सायकलच मिळाली नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागात हीच परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांच्या सायकलची चाके फिरणार तरी कधी, असा सवाल विचारला जात आहे. दुसरीकडे, मोफत सायकल योजनाच ‘पंक्चर’ झाल्याचे चित्र असून यामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. समाज कल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच पंचायत समिती अंतर्गत मोफत सायकल योजनेचे वितरण दरवर्षी होत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या योजनेचा लेटलतीफपणा दिसून येत आहे. सायकलसाठी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पाठवा, अशा सूचना देणारे पत्र दोन-तीन दिवसांपूर्वीच पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे धडकले आहे. त्यामुळे आधीच उशीर झालेल्या सायकल योजनेच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सर्वत्र तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे.उमरेड तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत १२७ शाळा तर सुमारे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांना दोन - चार किलोमीटरची पायपीट करीत शाळा जवळ करावी लागते. गाव ते शाळा आणि शाळा ते पुन्हा गाव अशी सर्कस करीत असताना विद्यार्थी मानसिक, शारीरिकरीत्या थकतो. गावखेड्यातील ही परिस्थिती लक्षात घेता, सायकल योजना सुरू करण्यात आली. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ आणि कामचलावू धोरणामुळे या विद्यार्थ्यांना योजेनेचा लाभ मिळण्यात दिरंगाई होत आहे.