शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम लावण्याच्या नावावर सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:44 IST

‘एटीएम’साठी जागा भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देनागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘एटीएम’साठी जागा भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.दत्तात्रय येलुकर (६६) हे जयदुर्गा सोसायटी बेलतरोडी येथे राहतात. ते सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी २५ मे रोजी एटीएमसाठी जागा भाड्याने हवी असल्याबाबतची जाहिरात पाहिली. त्यात दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावर कथित इंडिया कॅश एटीएम कोलकाता येथील आरोपी आकाश अग्रवाल, श्वेता तिवारी आणि स्नेहा शर्मा ऊर्फ घोष यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी येलुकर यांना १० लाख रुपये जमा करण्यास सांगितले. यानंतर त्यांना २० हजार रुपये दरमहा भाडे, नोकरी आणि एक बाईक देण्याचे आमिष दाखविले. रुपये जमा करण्यास नकार दिल्यानंतर तिघांनीही येलुकर यांना फोन करून अ‍ॅग्रीमेंट करण्यासाठी दबाव टाकला. त्यांनी शुल्क व विमा पॉलिसीच्या नावावर ५८,६०० रुपये जमा करण्यास सांगितले. येलुकर यांनी ती रक्कम जमा केली. यानंतरही आरोपी त्यांना पैसे जमा करण्यास सांगत होते. तेव्हा येलुकर यांनी पैसे भरण्यास नकार दिला आणि आपले पैसे परत मागितले. यानंतर आरोपींनी संपर्क तोडला. त्यानंतर येलुकर यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. येलुकर आणि त्यांचे कुटुंबीय उच्च शिक्षित आहेत. आरोपीकडून आपली फसवणूक होईल, याचा त्यांना संशय सुद्धा आला नाही. याप्रकारचे अनेक प्रकरण यापूर्वीही उघडकीस आले आहेत. यात दिल्लीतील गुन्हेगारांचा सहभाग राहिलेला आहे. ते सहसा हाती येत नाही.

टॅग्स :fraudधोकेबाजीatmएटीएम