शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बैद्यनाथच्या संचालकांसोबत दगाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बैद्यनाथचे संचालक प्रणव सुरेशकुमार शर्मा (वय ३७) यांच्यासोबत राजस्थान, उदयपूरमधील एका शिक्षण संस्थेच्या संचालकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बैद्यनाथचे संचालक प्रणव सुरेशकुमार शर्मा (वय ३७) यांच्यासोबत राजस्थान, उदयपूरमधील एका शिक्षण संस्थेच्या संचालकांनी सव्वा कोटीची ठगबाजी केली. मनमोहनराज नाहरमलजी सिंघवी (वय ६०), अभय मनमोहन सिंघवी (वय ४५), शांतीलाल कन्हैयालालजी सरूपिया (वय ६५) आणि पीयूष शांतीलाल सरूपिया (वय ४५) अशी आरोपींची नावे आहेत. हे चारही आरोपी उदयपूरचे रहिवासी आहेत.

शर्मा यांच्या तक्रारीनुसार, या चाैघांनी २८ सप्टेंबर २०१७ ला शर्मा यांच्या फोर्थ पार्टनर एनर्जी प्रा. लि. चे सोलर पॅनल आरोपींच्या एस. एस. एज्युकेशन ट्रस्टच्या इमारतीवर लावले होते. प्रणव शर्मा आणि त्यांच्या भागीदार भावना शर्मा यांनी ते पॅनल फोर्थ पार्टनर एनर्जीकडून १ कोटी, २३ लाख ३२ हजार ८०० रुपयांत खरेदी केले होते. या सोलर प्लांटमधून उत्पन्न होणारी वीज आरोपींची एज्युकेशन ट्रस्ट वापरेल आणि त्या विजेचा भरणा ४.३५ रुपये प्रति किलो व्हॅटप्रमाणे शर्मा यांच्याकडे केला जाईल, असा लेखी करार झाला होता. त्यानुसार आरोपींनी जानेवारी २०१८ पासून वीज वापरली. मात्र, त्याचे १९ लाख रुपये शर्मा यांना दिले नाही. त्याचप्रमाणे त्यांचा १ कोटी ३२ लाखांचा सोलर प्लांटही स्वत:च्या ताब्यात ठेवला. त्यांनी दगाबाजी केल्याचे लक्षात आल्याने शर्मा यांनी गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

---

अनेक दिवसांपासून होता वाद

आरोपींनी आपसी सामंजस्यातून रक्कम द्यावी आणि वाद सोडवावा म्हणून शर्मा यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, अनेकदा शब्द देऊनही आरोपींनी तो पाळला नाही. त्यामुळे अखेर प्रकरण पोलिसांत गेले.

----