शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टीवर गुजरातच्या चारपट रॉयल्टी

By admin | Updated: November 26, 2015 03:12 IST

भाजप नेत्यांनी नेहमी गुजरातमध्ये असलेल्या बाबींची उदाहरणे देत ‘गुजरात मॉडेल’ हेच विकासाचे मॉडेल असल्याचा दावा केला.

स्वस्त घर कसे बांधणार :गिट्टीचा तुटवडा कायमनागपूर : भाजप नेत्यांनी नेहमी गुजरातमध्ये असलेल्या बाबींची उदाहरणे देत ‘गुजरात मॉडेल’ हेच विकासाचे मॉडेल असल्याचा दावा केला. गिट्टीवर आकारण्यात येणाऱ्या रॉयल्टीच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र सरकारला गुजरातचा विसर पडलेला दिसतो. गुजरातमध्ये गिट्टीवर १०० रुपये प्रति ब्रास रॉयल्टी आकारली जाते. महाराष्ट्रात मात्र याच्या चारपट म्हणजे ४०० रुपये रॉयल्टी आकारली जात आहे. रॉयल्टीच्या या भुर्दंडामुळे सामान्य नागरिकांना घरबांधणीसाठी महागडी गिट्टी खरेदी करावी लागत आहे. एकीकडे सर्वांना स्वस्त घर देण्यासाठी सरकार विविध योजना राबविण्याची घोषणा करीत आहे. तर, दुसरीकडे नागरिकांना कमाईच्या पैशातून स्वस्त घर बांधणे कठीण होत चालले आहे. महाराष्ट्रात गिट्टीवर २०० रुपये प्रति ब्रास रॉयल्टी आकारण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने ११ मे २०१५ रोजी गौण खनिजावरील रॉयल्टी दुप्पट केली. आता प्रति ब्रास ४०० रुपये रॉयल्टी आकारली जात आहे. या विरोधात आॅरेंज सिटी स्टोन क्रशर ओनर्स असोसिएशन, नागपूरने १५ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. संपामुळे विदर्भातील सुमारे दीड हजारावर क्रशर बंद आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यातील सर्व २९५ क्रशर बंद आहेत. आता मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथील क्रशर मालकांनीही संपाला पाठिंबा देत २९ नोव्हेंबरपासून संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गिट्टी उत्पादन बंद होणार आहे. आताच बांधकामासाठी गिट्टी मिळणे बंद झाले आहे. क्रशर मालकांचा संप आणखी वाढला तर सर्व बांधकामे बंद पडण्याची चिन्हे आहेत.सुमारे २१ वर्षांपूर्वी राज्य सरकारने रॉयल्टीचे धोरण आखले व दर तीन वर्षांनी रॉयल्टी दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी रॉयल्ली प्रति ब्रास फक्त ७ रुपये होती. ती दर तीन वर्षांनी १४, २८, ५०, १०० व २०० अशी वाढविण्यात आली. याच धोरणाचा आधार घेत आता सरकारने रॉयल्टी दुप्पट म्हणजे ४०० रुपये केली आहे. विशेष म्हणजे रॉयल्टी अत्यल्प असल्यामुळे दुपटीने वाढीचा निर्णय घेण्यात आला होता. एका मर्यादेनंतर रॉयल्टी दुप्पट केली तर त्याचा मोठा भुर्दंड बांधकाम करणाऱ्यांवर बसणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता रॉयल्टीच्या वाढीची मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे.ही वाढ करताना राज्य सरकारने शेजारच्या राज्यातील दरही विचाराच घेतलेले नाहीत. गुजरात, मध्यप्रदेश व राजस्थान या भाजपशासित तिन्ही राज्यांमध्ये रॉयल्टीचे दर प्रति ब्रास १०० रुपये आहेत. छत्तीसगडमध्ये तर फक्त ८० रुपये रॉयल्टी आहे.यामुळे संबंधित राज्यांमध्ये बांधकामांसाठी गिट्टी स्वस्तात उपलब्ध होत आहे. आॅरेंज सिटी स्टोन क्रशर ओनर्स असोसिएशन, नागपूरचे अध्यक्ष रमेश गिरडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, क्रशर मालकांना रॉयल्टी भरायची आहे. मात्र, कोणतीही करप्रणाली सोयीची असेल तर लोक कर भरतील. त्यात अवास्तव वाढ केली तर व्यवसाय करणे कठीण होईल.