शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कोविंद मनपाच्या कार्यक्रमाला येणारे चौथे राष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:47 IST

देशाच्या राष्ट्रपतींनी कार्यक्रमाला येणे हा महापालिकेसाठी गौरवाचा क्षण असतो.

ठळक मुद्देभट सभागृहाचे लोकार्पण : राष्ट्रपती राधाकृष्णन, डॉ़ शंकरदयाल शर्मा, प्रणव मुखर्जी आले होते कार्यक्रमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या राष्ट्रपतींनी कार्यक्रमाला येणे हा महापालिकेसाठी गौरवाचा क्षण असतो. नागपूर महापालिकेच्या इतिहासात आजवर तीनदा अशा गौरवशील क्षणांची नोंद झाली आहे. यात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. शंकरदयाल शर्मा व प्रणव मुखर्जी आदींचा समावेश आहे. सुरेश भट सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने २२ सप्टेंबरच्या कार्यक्रमाला येणारे रामनाथ कोविंद हे चौथे राष्ट्रपती ठरणार आहेत.नागपूर महापालिकेने १५१ वर्षे पूर्ण केली आहेत़ कधी काळी १ लाख ६० हजार रुपये उत्पन्न असणाºया महापालिकेचा अर्थसंकल्प आता अडीच हजार कोटींवर गेला आहे. १९६४ साली महापालिकेला शंभर वर्षे पूर्ण झाली होती़ त्यानिमित्ताने आयोजित शताब्दी महोत्सवाला त्यावेळचे राष्ट्रपती महामहीम डॉ़ सर्वपल्ली राधाकृष्णन उपस्थित होते़ महापालिकेच्या शताब्दी ग्रंथाचे त्यांनी प्रकाशन केले होते़ त्यानंतर ९ डिसेंबर १९९५ रोजी सतरंजीपुरा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा उपस्थित होते़ तसेच १४ सप्टेंबर २०१५ रोजी महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले हाते.मानकापूर येथील क्रीडा संकुलात हा देखणा सोहळा पार पडला़ आता २२ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भट सभागृहाचे लोकार्पण होत आहे.महापालिकेच्या कार्यक्रमांना हजेरी लावणारे कोविंद हे चौथे राष्ट्रपती असतील़ महापालिका प्रशासन यासाठी सज्ज झाले आहे.मान्यवरांचा गौरवमहापालिकेच्या इतिहासात अनेक मान्यवरांचा महापालिकेने गौरव केला आहे़ २२ डिसेंबर १९२६ रोजी महात्मा गांधी यांना नागपूर नगरपालिकेतर्फे मानपत्र अर्पण करण्यात आले होते़ ५ आॅक्टोबर १९२८ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही मानपत्र अर्पण करण्यात आले़ २ डिसेंबर १९२९ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांना तर १६ मार्च १९३५ रोजी डॉ़ राजेंद्रप्रसाद यांना मानपत्र प्रदान केले होते़ माजी राष्ट्रपती डॉ़ अब्दुल कलाम हे दोनदा नागपुरात येऊन गेले होते़