शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बायो वेस्टमध्ये चौपट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:07 IST

कोरोनामुळे वाढला कचरा : दररोज निघतोय ३,५०० किलो जैविक कचरा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मार्चपासून नागपूर शहरात कोरोनाबाधितांची ...

कोरोनामुळे वाढला कचरा : दररोज निघतोय ३,५०० किलो जैविक कचरा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मार्चपासून नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात यात प्रचंड वाढ झाली. यामुळे शहरातील बायोमेडिकल वेस्टमध्ये सरासरीच्या तुलनेत जवळपास चौपट वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात दररोज ७०० ते ९०० किलो निघणारा कचरा आता ३ हजार ५०० किलोवर गेला आहे. यात प्रामुख्याने कोरोनाबाधितांच्या कचऱ्याची भर पडल्याने, हा जैविक कचरा उचलण्याचा भावही चांगलाच वधारला आहे. एक किलो कचरा उचलण्यासाठी तब्बल १०० रुपये मोजावे लागत असल्याची माहिती आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरुवातीला एप्रिल ते जून २०२० या कालावधीत दररोज १५ ते २० बाधित आढळत होते. पुढे जुलैपासून यात वाढ व्हायला लागली. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास हा आकडा १ हजार ५००पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर पहिली लाट ओसरण्याला सुरुवात झाली, परंतु मार्च २०२१मध्ये पुन्हा दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या ७ हजारांवर गेली. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच जैविक कचऱ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दररोज ३ हजार ५०० किलो जैविक कचरा निघत आहे. किलोमागे १०० रुपये दर गृहित धरला, तर दररोज साडेतीन लाख रुपये रुग्णालयांना मोजावे लागत आहेत.

रुग्णांच्या शस्त्रक्रियेनंतर कॉटन, इंजेक्शन, आव्ही बॉटल, प्लास्टर, बॅण्डेज, सीरिंज, उपचार करताना वापरण्यात आलेल्या वस्तू आदींचा बायोमेडिकल वेस्टमध्ये समावेश होतो. परंतु, कोरोनामुळे यात मास्क, पीपीई किट, हातमोजे व अन्य वस्तूंची भर पडली आहे.

....

अन्य कचऱ्याचाही समावेश

हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांचा विचार करता, प्रत्येक रुग्णामागे ३५० ते ४०० ग्रॅम बायो वेस्ट निघणे अपेक्षित आहे, परंतु, हॉस्पिटलमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. सरसकट सर्व कचरा बायो वेस्ट म्हणून टाकला जातो. यामुळेही बायो वेस्टमध्ये भर पडली आहे. यामुळे खर्चही वाढला आहे.

.....

भांडेवाडी येथे विल्हेवाट

शहरातील बायो वेस्टची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. यावर मनपाचे नियंत्रण आहे. शहरातील हॉस्पिटलमधील बायो वेस्टची भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे विल्हेवाट लावली जाते. विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून यावर प्रक्रिया केली जाते, परंतु, कोरोना संक्रमणापासून येथील कर्मचाऱ्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे, यावर मनपा प्रशासनाची नजर आहे.