शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री वडेट्टीवारांच्या सौभाग्यवतींना गंडा

By admin | Updated: August 11, 2016 22:55 IST

विजय वडेट्टीवार यांच्या घरी सोनामाता आल्याची बतावणी करून दोघांनी वडेट्टीवार यांच्या सौभाग्यवतींना ६१,२०० रुपयांचा गंडा घातला

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 11 - माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या घरी सोनामाता आल्याची बतावणी करून दोघांनी वडेट्टीवार यांच्या सौभाग्यवतींना ६१,२०० रुपयांचा गंडा घातला. बुधवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली. तब्बल १२ तासांनंतर त्याची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.चर्चेचे मोहोळ उडवून देणारी ही घटना बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत घडली. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार वडेट्टीवार रामदासपेठेतील एका तारांकित हॉटेलच्या मागे राहतात. त्यांच्या कमलाई या निवासस्थानी बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ५० वर्षे वयोगटातील एक महिला आणि एक पुरूष आला. पुरुषाने ही महिला म्हणजे साक्षात सोनामाता आहे, असे सांगून बंगल्यात प्रवेश मिळवला. वडेट्टीवार सोनामातेचे निस्सीम भक्त आहे. त्यामुळे किरण विजय वडेट्टीवार (वय ४३) यांनी त्यांचा आदरसत्कार केला. महिलेने घरगुती स्वरूपाचे चमत्कार दाखवले. त्यामुळे किरण वडेट्टीवार यांचा विश्वास जास्तच वाढला. महिलेने साहेब बाहेरगावी गेले. त्यांच्याकडे लवकरच मोठी जबाबदारी येणार असून, सर्वत्र नाव होईल, अशी बतावणी केली. तर, सोबतच्या व्यक्तीने साहेबांनी (वडेट्टीवार) ५१ हजारांची दक्षिणा ठेवण्यास सांगितले होते, अशी बतावणी केली. वडेट्टीवार यांनी सांगितल्यामुळे खातरजमा करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, वडेट्टीवार गडचिरोलीच्या दौ-यावर असल्याने संपर्क झाला नाही.ईकडे महिलेचे चमत्कार बघून किरण वडेट्टीवार आणि त्यांच्या मुलीची श्रद्धा अढळ झाली. त्यांनी त्या महिलेसमोर ५१ हजार रुपये ठेवले. सोबतच्या पुरूषाने मुलांच्या नावाने काही दान करा, असे म्हटले. त्यामुळे मुलीने स्वत:चे ५६०० आणि पुन्हा दुसरे ५६०० असे एकूण १०, २०० रुपये ठेवले. अशा प्रकारे एकूण ६१, २०० रुपये घेऊन कथित माता आणि तिच्यासोबतचा व्यक्ती निघून गेला.

फोन आला, खुलासा झालाकाही वेळेनंतर विजय वडेट्टीवार यांच्याशी घरच्यांचा फोनवरून संपर्क झाला. ह्यसोनामाता घरी आल्या होत्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना ६१,२०० रुपये दिल्याचे सांगितले. वडेट्टीवार यांनी आपण असे काही सांगितलेच नाही, म्हटल्यामुळे किरण यांना फसगत झाल्याचे ध्यानात आले. या घटनेची तक्रार करावी की नको, अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या किरण वडेट्टीवार यांनी रात्री १० च्या सुमारास सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली.ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी आपल्या सहका-यांकडून लगेच चौकशी करून घेतली. त्यानंतर रात्री उशिरा फसवणूकीच्या आरोपाखाली ह्यत्याह्ण दोघांविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक कांडेकर यांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.