शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

वन अधिकारी एसीबीच्या पिंजऱ्यात

By admin | Updated: March 16, 2017 02:05 IST

वन विभागातील रपटा बांधकामाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी तीन लाख रुपयाची मागणी करणारा काटोल वन विभागाचा विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी

३.२० लाखाची लाच घेताना पकडले : वन विभागात खळबळ नागपूर : वन विभागातील रपटा बांधकामाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी तीन लाख रुपयाची मागणी करणारा काटोल वन विभागाचा विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काशीराम माकडे रा. गाडगेबाबानगर वानाडोंगरी आणि मोजमाप पुस्तिकेसाठी २० हजार रुपयाची मागणी करणारा वन विभाग नागपूर सर्कलचा शाखा अभियंता अनिल पडोळे रा. गोरेवाडा याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दोघांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाच्या झिरो माईल स्थित कार्यालयात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार हे कंत्राटदार असून सन २०१६ मध्ये काटोल परिक्षेत्र नागपूर वन विभागातील रपटा बांधकामाचे सब कॉन्ट्रॅक्ट रीतसर कार्यवाही करून मिळविले होते. सदर बांधकामाकरिता त्यांनी चार कामे पूर्ण करून केली होती. या कामांचे बिल ११.४६ लाख रुपये इतके झाले होते. ते बिल मिळविण्यासाठी कंत्राटदार हे काटोल वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (विभागीय) अशोक काशीराम माकडे यांना भेटले. त्यांनी बिल काढून देण्यासाठी तीन लाख रुपयाची लाच मागितली. तसेच त्याच कामाची मोजमाप पुस्तिका बिल काढण्यासाठी नागपूर सर्कलचे शाखा अभियंता अनिल पडोळे यांनी २० हजार रुपयाची मागणी केली. दोन्ही लोकसेवकाने लाचेची मागणी केली परंतु कंत्राटदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरुवातीला दोन्ही लोकसेवकांची पडताळणी केली. त्यानंतर त्यांनी लाच मागितल्याचे लक्षात येताच विभागाने त्यांना रंगेहात पकडण्याची योजना आखली. माकडे हा काटोल येथे कार्यरत आहे. त्याने बुधवारी कंत्राटदाराला पैसे घेऊन धरमपेठ येथील एका रेस्टॉरेंटमध्ये बोलाविले. ठरलेल्या योजनेनुसार कंत्राटदार एसीबीच्या चमूसह सकाळी १० वाजता रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. तिथे एसीबीने त्याला ३ लाख रुपये घेताना रंगेहात पकडले. यानंतर कंत्राटदाराने पडोळेशी संपर्क साधला. त्याने पैसे घेऊन झिरो माईल येथील वन विभागाच्या कार्यालयात येण्यास सांगितले. तिथे पैसे स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, पोलीस हवालदार भानुदास गीते, लक्ष्मण परतेकी, रेखा यादव, शिशुपाल वानखेडे, मनोज केदार आदींनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)